दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरपुणे

प्रयत्नांना यश , पीएमपीएलची चाके धावणार पाटस कुरकुंभ पर्यंत

पाटस प्रतिनिधी :- गणेश गायकवाड

 

 

मा. आमदार रमेशआप्पा थोरात याच्या शुभहस्ते आपल्या दौड तालुक्यामधील पाटस येथे हडपसर ते कुरकुंभ दरम्यान पी.एम.पी.एल.च्या बस चा शुभारंभ करण्यात आला. २० जून २०२१ रोजी. दौंड तालुक्यातील ‘वरवंड’ पर्यंत पी.एम.पी.एल.ची बससेवा सुरू झाली होती. हडपसर ते वरवंड या बस सेवेच्या शुभारंभ दिवशी पाटस आणि कुरकुंभ पर्यंत बससेवा सुरू करावी अशा मागणीचे पत्र पाटस ग्रामस्थांच्या वतीने तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तथा आयुक्त मा. राजेंद्र जगताप साहेब यांच्याकडे देण्यात आले होते.

दौंड तालुक्यात पाटस आणि कुरकुंभ हे महत्वाची गावे असून, लोकसंख्येच्या दृष्टीने देखील ही दोन्ही गावे मोठी आहेत. तसेच औद्योगिक वसाहत, पुणे जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, विविध शासकीय कार्यालये, सरकारी आणि खाजगी नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थी इ. घटक याचे पुणे शहराशी रोजचे दळण वळण आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मागणी असलेल्या दोन्ही गावांचा सर्व्हे करण्यात आला. तसेच कार्यालयीन प्रकिया देखील पूर्ण करून, आज अखेर पाटस आणि कुरकुंभ या दोन्ही गावांना बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

पी.एम.पी.एल.च्या बस सेवेमुळे दौंड तालुक्यातील पांढरेवाडी, मळद, कुरकुंभ, जिरेगाव, वासुंदे, रोटी, गिरीम, कानगाव, कुसेगाव, गार, हिंगणीगाडा आदी गावांना देखील मोठा फायदा होणार आहे. तसेच विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग याचे पुणे ला जाणे – येणे आता अधिक सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे.

सर्वांच्या मागणीची दखल घेऊन पी.एम.पी.एल. वाहतूक व्यवस्थापक मा. श्री दत्तात्रय झेंडे साहेब यांनी बससेवा सुरू केल्याबद्दल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी देखील वेळोवेळी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल यांचे मन: पूर्वक आभार.

या शुभ प्रसंगी बसचालक शिवलिंग पवार, वाहक बोरकर, शेवाळवाडी आगाराचे वाहतूक व्यवस्थापक सोमनाथ वाघोले साहेब यांच्यासह दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा समाज कल्याण सभापती सौ. सारिकाताई पानसरे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सोहेल खान, पंचायत समिती सभापती सौ. हेमलता ताई फडके, उपसभापती विकास कदम, महिला राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सौ. वैशाली नागवडे, पुणे जिल्हा नियोजन स्मिती सदस्य सत्वाशील शितोळे, मा. जि. प. सदस्य प्रशांत शितोळे, मा सरपंच योगेंद्र शितोळे, सरपंच अवंतीका शितोळे, उपसरपंच छगन म्हस्के ,शिवाजी ढमाले, सागर शितोळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृ उ बाजार समिती संचालक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पाटस व परिसरात ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक वर्ग उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे