*नेवाशातील घरकुल ड वर्ग यादीचा फेरसर्वे करा*नेवासा काँग्रेसचा धरणे आंदोलनाचा ईशारा*
प्रतिनिधी:- लखन वाल्हेकर
(नेवासा प्रतिनिधि) :- सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या घरकुल “ड” वर्ग यादीचा संपूर्ण तालुक्याचा फेरसर्वे करण्याची मागणी नेवासा काँग्रेसने पंचायत समितीकडे केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सर्वसामान्य, गोरगरीब जनता ज्यांना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही अशांसाठी राज्यात महाआवास योजना राबविली जात आहे . यासाठी पंचायत समितीकडून प्रत्येक गावासाठी सर्वे अधिकारी नेमण्यात आले आहे. परंतु गावातली ग्रामसेवक, गावपुढारी यांच्या दबावामुळे जे खरोखर घरकुलापासून वंचित आहेत त्यांची नावे यादीत न येता गाव पुढारीच्या जवळच्याना याचा लाभ मिळाला अशा अनेक तक्रारी आल्यानंतर नेवासा काँग्रेसने याची दखल घेत आज नेवासा पंचायत समिती गटविकास अधिकारी शेलारसाहेब यांची भेट घेऊन यावर चर्चा केली तसेच संपूर्ण तालुक्याचा फेरसर्वे करण्याची मागणी करण्यात आली त्वरीत फेरसर्वे न केल्यास वंचितांना बरोबर घेवुन धरणे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे नेवासा काँग्रेसकडून गटविकास अधिकारी यांना देण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी यांनी त्वरीत फेरसर्वे करून वंचीत कुटुंबा कडूंन अर्ज दाखल करून त्यावर सुनावणी घेण्यात येईल असे आश्वासन दिले .
यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, शहराध्यक्ष रंजन जाधव, उपाध्यक्ष मुसा बागवान, सेवादल अध्यक्ष रमेश जाधव, महीला काँग्रेसच्या शोभा पातारे, संघटक संदिप मोटे, मीडिया विभागाचे सचिन बोर्डे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष मुन्ना आतार, शहर अल्पसंख्याक विभागाचे अंजुम पटेल, इम्रान पटेल, राजुभाई पिंजारी, एनटी विभागांचे संजय होडगर, उपाध्यक्ष सतिष तऱ्हाळ, माऊली कोळेकर, शंकर कोळेकर, आदीसह काँग्रेस कमिटी सदस्य व तालुक्यातील घरकुलापासुन वंचीत असलेले नागरीक उपस्थित होते..