दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

पुणे

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे चेअरमन माननीय डॉक्टर पगारे यांचे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबासाहेब लिंगाडे यांनी केले स्वागत

 

प्रतिनीधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )

पुणे :  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनुसूचित जात जमाती आयोगाचे चेअरमन माननीय डॉक्टर पगारे हे पुणे या ठिकाणी आले होते . त्यांनी सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले . संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खरीनायक . गोवा मुक्ती आंदोलन , शाहिरी मधून प्रबोधन करणारे साहित्यिक लेखक लोककवी समाज सुधारक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाबासाहेब लिंगाडे (राजेंद्र) यांनी डॉक्टर पगारे यांचे स्वागत केले .

तसेच आर.एम.एच.मंञी मा.शैलेश तुरवणकर.यांनी लोकशाहिर अण्णाभाऊच्या आठवणी ताज्या केल्या.माझी मैना गावाकङ राहिली.माझ्या जिवाची होतीया काहिली ,या त्यांच्या अजरामर गीताची आठवण करून दिली. आलेल्या मान्यवर, पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला .

आपल्या शाहीरी मधून गिरणी कामगारांच्या प्रश्नावर, दिनदुबळे ,उपेक्षितांचे प्रश्न सरकार पर्यत मांडण्याच काम डफावर थाप मारून आपल्या कला पथका मधुन अण्णा भाऊ साठे यांनी केले.असे गौरवऊदगार.राष्ट्रीय मानव अधिकार हक्क राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा.माधवीताई लिंगाडे. (चोपडे) यांनी म्हटले.या प्रसंगी मा . जयदीप सोनवणे माननीय राजेश कर सर माननीय राहुल अवघडे माननीय रज्जाक भाई शेख माननीय नागेश जाधव माननीय प्रदीप सोनवणे माननीय राजेश साळुंखे कार्यकर्ते उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे