दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ह्योसंग कंप्यूटर सेंटर लाडगाव येथे संपन्न झालेल्या पाच दिवसीय गणेश महोत्सव ची सांगता

बाळासाहेब पिसाळ

आज दिनांक 23/9/2023 वार शनिवार रोजी ह्योसंग कंप्यूटर सेंटर लाडगाव येथे संपन्न झालेल्या पाच दिवसीय गणेश महोत्सव प्रसंगी सरपंच जयश्रीताई बागल, सरपंच लक्ष्मीताई बागल, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळू इथर, उपाध्यक्ष कृष्णाजी बागल, स्वातीताई बागल, जि.प.शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका नंदनवन मॅडम, गांगुर्डे मॅडम, थाले मॅडम यांनी गणेश आरती प्रसंगी उपस्थिती दर्शवली.सरपंच जयश्री ताई बागल तसेच शाळा व्यव्थापन समितीचे पदाधिकारी बाळू इथहर , कृष्णाजी बागल यांनी विद्यार्थ्यांना कम्प्युट बाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना कॉ्प्युटर ची मोफत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हयोसंग प्रा. लि.चे आभार व्यक्त केले.तसेच या प्रसंगी विद्यार्थी मित्रांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले त्यात कम्युटर जनजागृती यावर नाटिका सादर करण्यात आली,तसेच धार्मिक गाण्यांवर नृत्य सादरीकरण झाले त्याप्रसंगी पालक वर्ग आणि ह्योंसंग चे प्रधान सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच ह्या सर्व कार्यक्रम घडून आणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य ह्योंसांग चे मुख्य श्री राजर्षी गौतम सर यांचे प्रमुख सहकार्य राहीले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार आणि सर्वांच्या सहकार्याने गणेश मोहत्सव अगदी निर्विघ्नपणे पूर्ण झाल्यामुळे हयोंसंग कॉम्पुटर सेंटर चे प्रतिभा लिहिणार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे