दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

प्रधानमंत्री आवास योजनेतील लार्भाथ्यांची थकीत रक्कम 14000/- रु मिळवण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीचे तालुका सचिव यांची मागणी.

कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद)

कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद):- प्रधानमंत्री आवास योजना हि केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून सन 2022 पर्यंत सर्व बेघरांना घरे उपलब्ध करुन देणेबाबत केंद्र व राज्य शासन कटिबध्द आहे. प्रधानमंत्री आवास योजना नगरपरिषद कंधार मार्फत राबवत आहे. आवास योजनेसाठी 250000/-रु अनुदान असून काही लार्भाथ्यांचे शेवटचा टप्पा अंदाजीत 14000/- रु थकीत आहे. वारंवार लार्भाथी विचारपूस केले असता, तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत होती.

योजनेसाठी कंधार तालुक्यातील नगरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करुन बांधकाम केले आहे. कंधार शहरातील लाभार्थ्यांपैकी ज्याच्या खात्यात शासनाकडून 14000/- ही रक्कम अद्यापही नागरिकांच्या खात्यात आलेली नाही ही माहीती वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव अहेमद पठाण यांना कळताच त्यांनी लाभार्थ्यासोबत थकीत बाकी रक्कमेबद्दल कंधार नगरपरिषदेकडे 10/10/2022 रोजी मागणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे