दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

घोडेगाव तालुका ; प्रस्ताव शासन समितीकडे

नेवासा प्रतिनिधी। नेवासा तालुक्याचे विभाजन करून घोडेगाव हा नवीन तालुका निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाच्या समितीकडे पाठविला आहे. प्रस्तावित नविन घोडेगाव तालुक्यात 53 गावांचा समावेश करण्याची शिफारस प्रस्तावात असून नेवासा तालुक्यात 74 गावांचा समावेश राहणार असल्याचा प्रस्ताव असल्याची माहिती फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर वैरागर यांनी दिली.महाराष्ट्रात जनावरांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या घोडेगाव तालुक्याची नव- निर्मितीची मागणी 24 ऑगस्ट 2015 रोजी शासनाकडे करण्यात आली होती. वैरागर यांनी त्यासाठी शासकीयस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने नाशिक विभागीय आयुक्तांनी नेवाशाच्या तहसीलदारांना प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. हा परिपूर्ण झालेला प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाच्या समितीकडे पाठविला आहे. घोडेगाव तालुक्यात प्रस्तावित केलेल्या ग्रामपंचायत ठरावाची संपूर्ण प्रक्रिया नेवासा तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी, म्रामविकास अधिकारी यांनी पूर्ण केेलेली आहे.

तसेच भूमी अभिलेख यांनीही आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजपत्रित अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असून कामगार तलाठी यांचेकडून कडून 127 गावाचे क्षेत्र, क्षेत्रफळ, शेतकरी जमीन महसूल याबाबत गावनिहाय माहिती अद्ययावत केलेली आहे. तसेच प्रस्तावित घोडेगाव तालुका निर्मितीने सर्वसामान्य जनतेचा वेळ, पैसा, श्रमात बचत होणार असल्याची शिफारस विशेष लक्षवेधी ठरली आहे.

1 अब्ज 42 कोटी खर्च

प्रस्तावित घोडेगाव तालुका निर्मितीनंतर 18 शासकीय कार्यालयासाठी अंदाजे 1 अब्ज 42 कोटी 16 लाख 37 हजार 549 इतका आवर्ती खर्च आणि 99 कोटी 26 लाख 77 हजार रुपयांचा अनावर्ती खर्च आवश्यक आहे . शासकीय कार्यालय निवासस्थाने याकरिता घोडेगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच शासकीय 12 हेक्टर 34 गुंठे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यातील गावे

नेवासा खुर्द, खुपटी, चिंचबन ,गोणेगाव ,इमामपूर, मुुकिंदपुर,मक्तापूर, पिचडगाव, म्हसले ,खडका, बकु पिंपळगाव,मुरमे, खलाल पिंपरी, मडकी, प्रवरासंगम, टोका, वाशिम, म्हाळसापूर, माळेवाडी खालसा, ऊस्थळ दुमाला, हंडी निमगाव, बाभूळवेढा, नेवासा बुद्रुक, बेलपिंपळगाव, सुरेगाव गंगा, बेलपांढरी, बोरगाव, उस्थळ खालसा, गोधेगाव, धामोरी, भालगाव, बहीरवाडी, घोगरगाव, जैनपुर ,पाचेगाव, पुनतगाव, सलाबतपुर, बाभुळखेडा, दिघी, जळके बुद्रुक, जळके खुर्द, गोगलगाव, गळनिंब, सुरेगाव, दहिगाव, मंगळापूर, खेडले काजळी, शिरसगाव, गिडेगाव , गोयेगव्हाण, वरखेड, रामडोह माळेवाडी दुमाला, खामगाव, गोपाळपूर, कुकाणा, तरवडी, अंतरवाली, वडूले, जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे, सौंदाळा, भेंडा खुर्द, भेंदा बुद्रुक, गोंडेगाव, गेवराई, नजीक चिंचोली, सुलतानपूर, पाथरवाला, नांदूर शिकारी, सुकळी बुद्रुक, सुकळी खुर्द, वाकडी, पिंपरी शहाली.

प्रस्तावित घोडेगाव तालुक्याची गावे

घोडेगाव, झापवाडी, मोरगव्हाण, लोहारवाडी, शिंगवेतुकाई, राजेगाव , मांडे गव्हाण, लोहगाव, मोरेचिंचोरे, वांजोळी, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, शिंगणापूर, चांदा, रस्तापुर, कौठा, म्हाळस पिंपळगाव, देडगाव, देवगाव, शहापूर, फत्तेपूर, माका,महालक्ष्मी हिवरे, तेलकुडगाव, पाचुंदा, सोनई, खेडले परमानंद, शिरेगाव, अंमळनेर,निंभारी, करजगाव, पानेगाव, तामसवाडी, वाटापुर, गोमळवाडी, गणेशवाडी, लांडेवाडी, वडाळा बहीरोबा, माळीचिंचोरा, हिंगोणी, कांगोणी, बर्‍हाणपूर, खरवंडी, नारायणवाडी, धनगरवाडी, निपाणी निमगाव, रांजणगाव, नागापूर, कारेगाव, भानसहिवरे,खुणेगाव .

दृष्टीक्षेपात नेवासा

2011च्या जनगणनेनुसार नेवासा तालुक्याची लोकसंख्या 3 लाख 57 हजार 323 इतकी आहे. तालुक्यात 8 महसूल मंडल असून 127 गावे आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ 1 लाख 34 हजार हेक्टर असून पूर्वेला शेवगाव, दक्षिणेला नगर, पश्चिमेला श्रीरामपूर तर उत्तरेला औरंगाबाद जिल्हा आहे.

प्रस्तावित विभाजन

विभाजनानंतर नेवासा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 81 हजार 642 इतकर राहिलं. त्यात नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर व कुकाणा हे मंडल राहितील. या चार मंडलाचे क्षेत्रफळ 65 हजार 214 हेक्टर असेल. यात 74 गावांचा समावेश असेल. प्रस्तावित नवीन घोडेगाव तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 75 हजार 681 इतकी असेल. यात घोडेगाव, चांदा, सोनई, वडाळा बहीरोबा ही मंडले असेल तर 61 हजार 271 हेक्टर क्षेत्रफळ असेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे