दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

मेंगडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते कै. देवरामशेठ रणपिसे यांना हरीत श्रद्धांजली….

धनंजय मेंगडे पुणे प्रतिनिधी

मेंगडेवाडी प्रतिनिधी।मेंगडेवाडीमध्ये वटवृक्ष मेंगडेवाडी-एक हरीत चळवळ या ग्रुप अंतर्गत होणार्‍या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये निरगुडसर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कै. देवरामशेठ बाळाजी रणपिसे यांच्या स्मरणार्थ २५० रोपांचे वृक्षारोपण करून हरीत श्रद्धांजली देण्यात आली. त्यावेळी प्रामुख्याने फक्त देशी रोपे लावण्यात आली वड, पिंपळ, चिंच, आंबा व जांभूळ अश्या रोपांचा समावेश आहे. त्यामध्ये स्मशानभुमी, श्री गण्या डोंगर , व ईतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून जलप्रदूषण टाळण्यासाठी रक्षा पाण्यामध्ये विसर्जित न करता खड्डय़ात विसर्जित करून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ही झाडे भविष्यात नेहमीच आमच्या वडीलांच्या स्मृतींना उजाळा देतील अशी भावना त्यांचा मुलगा व वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुप नियोजक श्री सागर देवरामशेठ रणपिसे यांनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांच्या मुली, जावई, सुन, पुतणे व नातवंडे उपस्थित होते. वृक्ष संवर्धनासाठी लागणाऱ्या ठिबक, संरक्षक जाळीचा खर्च त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे