दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरकृषीवार्तानांदेड

नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येक हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मुख्यमंत्रीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहम्मद तनविरोदीनची मागणी.

कंधार प्रतिनिधी: एम. जे. सय्यद

प्रतिनिधी : सध्या जिल्हयात पावसाने हाहाकार माजवला असुन शेतक-यांच्या शेतीचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड जिल्हयात 85 मंडळात अतिवृष्टी झाली असुन, नदी-नाल्यांना महापूर आल्याने काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील उभी पिके, जमिनीसह वाहून गेली. तर बहुतांश ठिकाणची पिके सडून गेली आहेत. मागील अनेक वषार्पासून बळीराजा आर्थिक नुकसानीत येत असताना यावर्षी त्याहीपेक्षा बिकट स्थिती शेतक-यांची झाली आहे. परिणामी संततधार पाऊस सुरु असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी जिल्हाभरात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येक हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री कडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहम्मद तनविरोदीन यांनी केली आहे.

जिल्हयातील लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, किनवट, नायगाव, उमरी व अन्य तालुक्यात अतीवृष्टी होऊन 4 लाख 36 हजार 359 शेतक-यांच्या, 3 लाख 51 हजार 617 हेक्टर शेतामधील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाभरात सततच्या पावसामुळे शेतधूरे, बंधारे, जादा पावसाने तूटफुटीत आले असून, नदीकठा लगतचे शेतजमिनी खरडून गेले आहे. शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले आहे. या पावसामुळे अनेक पुलावरून पाणी जात असल्याने विविध गावाचा संपर्क तुटलेला आहे.

तर अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने मातीच्या घरासह चांगल्या घरांची देखील पडझड झाली आहे. यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. अशी बिकट परिस्थिती बळीराजावर आली असुन शासनाने आता पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहम्मद तनविरोदीन यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे