कंधार प्रतिनिधी।अतिवष्टी व पुर ग्रस्त भावाचे पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे कुरुळा दिग्रस रुई पेटवडज गोणार येलुर शिरूर कवठा धानोरा राऊतखेडा काटकळंबा बारुळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत तहसीलदार व्यंकटेश मुंडे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी सर्व शेतकऱ्यांनी खा. चिखलीकर यांना निवेदन देत शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई
हक्काचं पिक विमा मिळवून देण्याची मागणी केली
कंधार परिसरात दि 6 व 7 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे
कूरुळा रुई दिग्रस पेटवडज गोनार येलूर शिरूर कवठा धानोरा राऊत खेडा काटकळंबा बारुळ येथील शेतकऱ्यांची संवाद साधत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी श्रावण पाटील भिलवडे तहसीलदार व्यंकटेश मुंडे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख मंडळ अधिकारी रमाकांत भुरे पाटबंधारे विभागाचे अभियंता अभिजीत बळेगावकर महावितरणचे मोरे साहेब पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी संजय देशमुख भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे उपसरपंच शिवाजी वाकोरे बाळासाहेब शिंदे शिवकुमार देशमुख बाबुराव देशमुख गंगाराम हात्ते बाबुराव मडके संजय डिकळे धानोरा चे उपसरपंच गुलाब जाधव उत्तम पवळे आदी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी खा चिखलीकर यांच्याकडे रस्ता विजेची समस्या मांडली यावेळी खा चिखलीकर यांनी संबंधित खाते प्रमुखांना तात्काळ वीज व रस्त्यांचे प्रश्न सोडण्यास सांगितले शेतकऱ्यांनी पीक विमा ऑनलाईन होत नसेल तर ऑफलाइन कृषी सहाय्यक आकडे देण्यास सांगितले.