*महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी सटूआईचे दर्शन घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कामास सुरुवात.
बाळासाहेब पिसाळ
*महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी सटूआईचे दर्शन घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कामास सुरुवात….*
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातून काल भेटीगाठी दौऱ्यात सुरुवात केली.
यावेळेस महाराष्ट्रातील लहान (बाळाची )मुलांची देवी म्हणून सटू आईला ओळखलं जातं त्या सटूआईचे दर्शन घेऊन आरती घेऊन दर्शन करून राजेंद्र वाघमारे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात कामास सुरुवात केली.
समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बंटीभाऊ यादव, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, संगमनेर तालुका काँग्रेसचे रवींद्र शिंदे, नेवासा युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे
यावेळी मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव तोरमल म्हटले की आजच सटूआईने तुमची पाचवी पुजली तुम्ही खासदार निश्चित आहात.
नामदेव गोर्डे यानी सटूआई बद्दल माहिती सांगितली यापूर्वी या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आईचे दर्शन घेऊन गेले तर ते खासदारच झाले.सटूआई हे देवस्थान जागृत असून आईने अनेकांचे कल्याण केले आपलाही विजय निश्चित असेल,आईची महाआरती करून वाघमारे यांना आशीर्वाद दिला पुजारी आणि ट्रस्ट अध्यक्ष सचिव यांनी केली.
यावेळी संतोष तोरमल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निवासस्थानी अत्यंत चांगल्या पद्धतीच स्नेहभोजन देऊन.सत्कार केला
यावेळी गावातील भिमाजी तोरमन,रावसाहेब तोरमल बाबासाहेब शिंदे,अशोक तोरमल बबन तोरमल,एडवोकेट महेश उघडे,केशव गोर्डे सर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव गोर्डे, विठ्ठल वाकचौरे,अनिल वाकचौरे,बाबासाहेब गांगुने माऊली कांगूने,अब्दुल शेख, गंगाधर गोर्डे, संतोष तोरमल गणेश तोरमल व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.