नेवासा प्रतिनिधी-
नेवासा तालक्यातील नेवासा फाटा येथे कॉलनी परिसरात भरत असलेला गुरुवार चा आठवडा बाजार चोर बाजार ठरतोय का? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकाला पडत आहे.
दर आठवड्याला भरणारा गुरुवार चा आठवडे बाजार साठी नेवासा फाटा तसेच पंचक्रोशीतील बऱ्याच गावातून शेतकरी, नोकरदार,व्यापारी तसेच सर्वसामान्य जनता,मजूर इतर सर्व या आठवडे बाजारासाठी खरेदी विक्री साठी येत असतात.
परंतु दर आठवड्याला या आठवडे बाजारातून मोबाईल चोरी च्या घटना सातत्याने घडत असतात,अगदी काही क्षणात अलगदणे मोबाईल चोरी होतो व दुसऱ्या क्षणाला जाणवतो देखील पण तो पुन्हा मिळत नाही अशा घटना आपल्याला बघायला मिळतात.सर्वसामान्यांसाठी लगेच दुसरा मोबाईल घेणे शक्य नसते,बरेच जण रडत घरी जातात,मोबाईल हा अगदी साधा बटणाचा असो किंवा अगदी स्मार्ट फोन असो मग तो दोन हजार रुपये चा असो किंवा चाळीस ते पन्नास हजारांपासून पुढे किंवा. त्यातल्या आत किमतीचा असो,अश्या बऱ्याच घटना होत असतात.
कुणी कुणी मोबाईल चोरी गेल्यानंतर आपल्या कर्माला दोष देत पोलीस ठाण्यात तक्रार न करता आपल्या घरी जाऊन स्वतः ला दोष देत बसतात.
अशीच घटना काल स्वतः ला मला अनुभवयाला मिळाली,बाजारात बाजार करत असताना अगदी मिनिटाच्या आत मोबाईल गेला , ताबडतोब जाणवल्यानंतर फोन लावला रिंग वाजली,आणि दुसऱ्याच क्षणाला मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यानंतर पोलीस स्टेशन ला अर्ज देऊन नवीन सिम बनवून घेतले.
परंतु सर्व सामान्य जनतेने काय करायचं? कुणाकडे अपेक्षेने बघायचं?त्यांना न्याय मिळणार का?असे एक ना अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरीत राहणार का असा सवाल मनात उपस्थित राहतोय.
आठवडे बाजारातून आतापर्यंत कित्येक जणांचे मोबाईल गेलेले व्यक्ती यांच्या घटना ऐकल्या व आठवडे बाजारात पोलीस प्रशासनाने यावर लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे.अशा चोरी मारी करणाऱ्या लोकांवर योग्य वेळी अंकुश ठेवला गेला नाही तर भविष्यात त्यांना अजून बळ भेटल्याशिवाय राहणार नाही
तरी नेवासा पोलीस प्रशासनाने यावर गांभीऱ्याने विचार करून ठोस पावले उचलावीत अशी विनंती करण्यात येत आहे