दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरनिधन-वार्ता

मांडवगण फराटा आणि परिसरातील व पुणे जिल्ह्यातील एक थोर व्यक्तिमत्व, आदरणीय कै. नामदेवरा़व दिनकरराव फराटे ऊर्फ एनडी दादा काळाच्या पडद्याआड

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक

अहमदनगर प्रतिनिधी-मांडवगण फराटा आणि परिसरातील व पुणे जिल्ह्यातील एक थोर व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व कै. नामदेवरा़व दिनकरराव फराटे ऊर्फ एन डी दादा ह्यांचे गुरुवार दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले.दादांचा जन्म 1929 साली मांडवगण फराटा येथील प्रगतिशील शेतकरी कै. दिनकरराव गणपतराव फराटे उर्फ भाऊ यांच्या पोटी झाला.मांडवगण फराटा गावामध्ये नामदेव नावाच्या बऱ्याचशा व्यक्ती असल्यामुळे दादांना एनडी दादा ह्या टोपण नावाने गावातले व परिसरातील सर्व लोक संबोधित असत. दादांच्या पत्नी कै. सौ.वत्सलाबाई यांचे २००४ व कै.सौ.ठकुबाई यांचे२०२२ साली दुःखद निधन झाले. मातोश्री ठकुबाई खूप प्रेमळ व उत्तम गृहिणी होत्या.तर मातोश्री वत्सलाबाई ह्या अशिक्षित होत्या. परंतु अत्यंत सुसंस्कृत होत्या. मातोश्रींचे शिक्षण कमी असताना देखील त्यांचे गणितामधील अनेक पाढे पाठ होते. पावकी, निमकी, पाऊणकी, अडीचकी पासून वीस पर्यंत पाढे पाठ होते. त्या जात्यावर दळायला बसल्या कि अत्यंत सुरेल आवाजामध्ये ओव्या गात असत. मातोश्रींच्या अनेक ओव्या पाठ होत्या. त्या ओव्या गाऊ लागल्या की घरातली बाई माणसे, शेजार पाजारच्या महिला त्यांच्या ओव्या ऐकण्यासाठी आवर्जून येत. वत्सलाबाई मातोश्री ह्या मांडवगण आणि परिसरातील बहिणाबाई चौधरी होत्या असे म्हटले तर वावगे होणार नाही.दादांच्या मागे पाच मुले व एक मुलगी तसेच, पुतणे, पुतणी, नातवंडे असा खूप मोठा परिवार आहे.दादांना दोन भाऊ एक सिताराम अण्णा फराटे व दुसरे कै. आत्माराम फराटे. आत्माराम भाऊंचे अविवाहित असतानाच निधन झाले.दादांचे थोरले चिरंजीव सुभाषराव भाऊ. सुभाषराव भाऊंना एक मुलगा व तीन मुली आहेत. सुभाषराव भाऊ प्रगतिशील शेतकरी असून भाऊंच्या पत्नी पद्मिनीताई ह्या उत्तम गृहिणी आहेत. भाऊंचे चिरंजीव श्री. काशिनाथ बापू हे बीएस्सी ऍग्री. झालेले असून ते प्रगतिशील शेतकरी आहेत. भाऊंच्या कन्या सौ.शामल ताई दिवेकर,सौ प्रमिलाताई निंभोरे व सौ. चंदाताई तावरे ह्या उत्तम गृहिणी आहे. दादांचे दोन नंबरचे चिरंजीव म्हणजे बाळकृष्ण आबा हे प्रगतिशील शेतकरी असून आबांच्या पत्नी सौ. लताताई ह्या उत्तम गृहिणी आहेत. आबांचे चिरंजीव धनंजय हे बीकॉम असून प्रगतिशील शेतकरी आहेत, तर आबांचे दुसरे चिरंजीव श्री. विक्रम हे अॅडवोकेट असून शिवाजीनगर पुणे येथील कोर्टामध्ये प्रॅक्टीस करतात. ते दोन-तीन बँकांच्या पॅनलवर देखील आहेत.दादांचे तीन नंबरचे चिरंजीव श्री. बाळासाहेब उर्फ आप्पा हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्या पत्नी सौ संगीताताई या उत्तम गृहिणी आहेत. आप्पांचे चिरंजीव श्री. निलेश यांनी कम्प्युटर सायन्स मध्ये बीई केलेले असून अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी मधून एम एस केलेले आहे. श्री. निलेश हे अमेरिकेमध्ये एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आप्पांच्या कन्या डॉक्टर सौ. सोनाली राहुल पाटील या बीएमएस असून त्यांनी देखील एम एस केलेले आहे. आप्पांचे जावई राहुल पाटील हे एमबीए असून जळगाव येथील लोकमत उद्योग समूहामध्ये कार्यरत आहेत.दादांचे चार नंबरचे चिरंजीव श्री. संपतराव उर्फ काका हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्या पत्नी सौ. सुनीताताई या उत्तम गृहिणी आहेत. काकांचे चिरंजीव श्री. सागर हे बीएससी ऍग्री असून इफको कंपनीमध्ये कार्यरत आहेत. काकांच्या कन्या कोमल ह्यांनी कम्प्युटरमध्ये बीई केलेले असून सध्या त्या यूपीएससी परीक्षेच्या तयारी करीत आहेत.दादांचे पाच नंबरचे चिरंजीव श्री. नानासाहेब उर्फ नाना हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्या पत्नी सौ. सुमनताई ह्या उत्तम गृहिणी आहेत.दादांच्या कन्या सौ. रत्नप्रभा उर्फ सत्यभामा राजाराम जगताप या उत्तम गृहिणी असून त्यांचे पती राजाराम जगताप हे एस के एफ बेअरिंग कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्याकाळी कोरडवाहू शेती होती. शेतीमध्ये ज्वारी बाजरी मूग अशी पिके निघायची. त्यावेळी हडपसरला कडब्याचा बाजार भरत असे. दादांचे वडील दिनकरराव भाऊ मांडवगण वरून बैलगाडी घेऊन हडपसरला कडबा नेत असत. त्यावेळी लूटमार होत असायची. म्हणून कडबा विक्री करून आलेले पैसे भाऊ आपल्या जवळ न ठेवता गाडीच्या आखाला म्हणजे एक्सलला बांधत असत. म्हणजेच पैसे चोरी जावू नये म्हणून गुप्त ठिकाणी ठेवले जात असत.भाऊ मुंबईला जायचे. रेल्वेने जायचे. पाटस हे रेल्वे स्टेशन असायचे.भाऊ मांडवगण ते पाटस पायी प्रवास करायचे व पाटस वरून पुढे रेल्वेने मुंबईला जायचे. भाऊंची दोन मुले एक नामदेव उर्फ एनडी दादा आणि दुसरे सिताराम अण्णा. त्यावेळी दादांची एक आत्या आवडाबाई ह्या मुंबईला असायच्या. दादा आणि सिताराम अण्णा हे आवडाबाईंच्या कडे राह्यला असायचे. दादा आणि अण्णा हे दिवसा हँडलूम कंपनीमध्ये काम करायचे व रात्री आगरकर रात्र प्रशाळा वरळी, मुंबई ह्या शाळेत जायचे. सिताराम अण्णा सातवी पास झाले. तर दादा मॅट्रिक झाले.मॅट्रिक पास होणारे दादा हे मांडवगण आणि परिसरामधील पहिली व्यक्ती होत. दादांना इंग्रजी येत होती. दादांना मोडी पण अवगत होती.कै किसनराव पंढरीनाथ फराटे पाटील यांनी 1920 साली सोसायटी स्थापन केली. नंतर किसनराव तात्यांनी व माधवराव अण्णांनी एक इंग्लिश जाणणारा तरुण म्हणून एनडी दादांना 50 सालचे दरम्यान ग्रामपंचायत मध्ये सचिव म्हणून कामाला लावले. पुढे एनडी दादांनी मांडवगण फराटा ग्रामपंचायत मध्ये कै. माधवराव अण्णांच्या बरोबर दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले.1955/60 च्या दरम्यान प्रभारी सरपंच म्हणून एनडी दादांनी सरपंचपद भूषविले. घोड धरणाचा उजवा कालवा काही टेक्निकल अडचणी मुळे होऊ शकत नव्हता. तरी देखील 1960 च्या दरम्यान रावसाहेब दादा पवार आमदार असताना एनडी दादांनी रावसाहेब दादांना साथ देऊन हा कालवा तयार करण्यामध्ये मोठी मदत केली. 1965 /66 साली पाटा द्वारे पाणीवाटप सुरू झाले. मांडवगण फराटा, वडगाव रसाई, सादलगाव ह्या परिसरामधील सहा सात गावे बारमाही बागायती झाली. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचे स्वर्गीय किसनदास बरमेचा अध्यक्ष होते. 1960 65 च्या दरम्यान मांडवगण फराटा येथे वाघेश्वर विद्यालयाची या संस्थेद्वारे स्थापना करण्यात आली. गावातील थोर दानशूर व्यक्तिमत्व पृथ्वीराज मथुरिया सेठ ठाकूर, शामशेठ झंवर तसेच रावसाहेब फराटे यांनी शाळेसाठी जमीन बक्षीस दिली. वाघेश्वर शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ह्या ट्रस्टचे दादा अध्यक्ष होते. तर किसनराव भाऊ फराटे उपाध्यक्ष होते. एन डी दादा मांडवगण विविध कार्यकारी सोसायटीचे सलग अठरा वर्षे बीनविरोध चेअरमन होते. दादांच्या काळातच सोसायटीने डिव्हिडंड देण्यास सुरुवात केली. एक वर्षी सर्वसभासदांनी मिळून 40 लाख रुपये डिव्हिडंड शाळेसाठी देण्याचे ठरविले व वीस खोल्यांचे काम दादांच्या काळात झाले. मांडवगण सोसायटीला दरवर्षी पाच लाख रूपये भाडे मिळते.दादांच्या काळात मांडवगण विविध कार्यकारी सोसायटी पुणे जिल्ह्यात एक नंबरची सोसायटी झाली. एन डी दादा शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. त्यावेळी शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे गोडाऊन विक्रीस निघाले. हे गोडाऊन एनडी दादांच्या साह्याने मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीने विकत घेतले. दादांच्या काळामध्ये सोसायटीचा वसुल शंभर टक्के असायचा. त्यामुळे सोसायटीला नाबार्ड. तसेच पीडीसीसी बँकेकडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. स्वर्गीय किसनराव तात्या, माधवराव अण्णा, भाऊ साहेब गणपतराव फराटे, सर्जेराव शितोळे, कोंडिराम आप्पा फराटे, नामदेव बापू खंडेराव फराटे, किसनराव बाबुराव फराटे, ज्ञानदेव शंकरराव फराटे,बळवंत यशवंत फराटे, विष्णुपंत रंगोबा फराटे, दशरथ दिनकर फराटे पाटील, शामराव आप्पा चकोर, मल्हारराव आबा फराटे पाटील, बाबासाहेब रघुनाथराव फराटे, किसनराव दरेकर, आनंदराव पांडुरंग जगताप, कांतीलाल एकनाथ जगताप, पोपटराव जगताप, विनायकराव अण्णा पांडुरंग फराटे , ह भ प सर्जेराव फराटे गुरुजी यांनी दादांना खूप मोठे सहकार्य केले. माजी आमदार रावसाहेब दादा पवार, दत्तू अण्णा ढमढेरे,किसनराव भुजबळ, बापूसाहेब थिटे, पोपटराव गावडे,सूर्यकांत पलांडे काका, बाबुराव काका घाटगे, मोहनराव बाबा मोकाशी यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन दादांना लाभले. दादांच्या नेतृत्वाखाली त्याकाळी गावामध्ये एक पंच कमिटी असायची . पंच कमिटीचे नामदेवराव बापू फराटे, सर्जेराव शितोळे, भाऊसाहेब पाटील हे कमिटी मेंबर असायचे. ही कमिटी गावातील तंटे सोडवायची. आपल्या गावातील वाद चव्हाट्यावर येऊ देत नव्हते. कोर्टामध्ये जाऊ देत नव्हते. पोलीस स्टेशनला जाऊ देत नव्हते.एवढे मोठे काम ही पंच कमिटी त्यावेळी करायची. दादा हे अत्यंत शिस्तबद्ध होते. काटकसरी होते. गांधीजींच्या विचारांचा पगडा दादांच्यावर होता. दादा हे गांधीवादी होते. गांधी टोपी,नेहरू शर्ट,धोतर असा त्यांचा पेहराव असे. दादा शाकाहारी होते. माळकरी होते. दादा आळंदी पंढरीची दर महिना वारी करायचे. दादा हे गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत असायचे. दादा सोसायटीचे चेअरमन असताना दादांनी गावातीलच श्री राजू लोखंडे ह्या विद्यार्थ्याला महिना तीनशे रुपये सोसायटीच्या वतीने मदत केली. सदर विद्यार्थी पुढे एमएससी ॲग्री झाला. हाच तरुण पुढे आफ्रिकेमधील केनिया या देशामध्ये एका मोठ्या फ्लाॅरिकल्चर कंपनीमध्ये कार्यरत आहे. दादांनी समाजासाठी जेवढे कार्य केले तेवढेच कार्य दादांनी आपल्या कुटुंबासाठी देखील केले. दादांना वडिलोपार्जित 35 एकर जमीन वाट्याला आली. दादांनी ह्या 35 एकरामध्ये आणखी 70 एकरांची भर घातली. 105 एकर जमीन केली. 105 एकरां पैकी पाच एकर जमीन दादांनी आपल्या लेकीला दिली. त्याकाळी मुलीला स्वतःच्या जमिनीमध्ये वाटा देणारे दादा हे पहिले सदगगृहस्थ होऊन गेले. एन.डी. दादांच्या सारखे थोर व्यक्तिमत्व आता होणे नाही. दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली??. काही कौटुंबिक अडचणीमुळे दादांचा दशक्रिया विधी थोडा अलीकडे घेण्यात आलेला आहे. दादांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 21/11/2022 रोजी मांडवगण फराटा येथे भीमानदी तीरी होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे