शिरुर प्रतिनिधी-शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील रहिवासी प्रशांत चौधरी यांनी त्यांच्या आठ वर्षाच्या साईला 8 ते 9 महिन्यापूर्वी ॲक्टिंग आणि डान्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी लेखक ,दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे , अभिनेत्री, कोरिओग्राफर अश्विनी इरोळे यांच्या शिरूर येथील 13 वर्षापासून कार्यरत असलेल्या नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये त्याचा प्रवेश घेतला.

दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे सध्या एका नवीन विषयावर चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटासाठी सध्या कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू आहे. इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स करत असलेल्या काही कलाकारांना या चित्रपटात घ्यायचे या हेतूने आणि त्यातच साईचा वाढता अभिनय पाहून या चित्रपटात नामांकित कलाकारांसोबत विशेष भूमिकेसाठी साई चौधरी ची निवड भाऊसाहेब इरोळे यांच्या अश्वयुग फिल्म प्रॉडक्शन मार्फत निवडपत्र देऊन करण्यात आली असून हा चित्रपट साधारण डिसेंबर ते जानेवारीच्या आसपास लोणावळा, नाशिक , पालघर इत्यादी ठिकाणी चित्रित केला जाणार आहे. एका खेडेगावातील मुलाची चित्रपटासाठी निवड झाल्यामुळे सध्या मांडवगण फराटा परिसरात साईचे कौतुक केले जात आहे