दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपर

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथोस्वासारखा उपक्रम प्रभावी – जयंत येलूलकर

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक

अहमदनगर प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर,आचार्य सम्राट आनंदऋषीजी,अवतार मेहेरबाबा, दासगुरु या सारख्या थोर संत साहित्यिकांची उज्वल परंपरा लाभलेल्या नगर जिल्ह्यात ग्रंथोत्सवासारखा स्त्युत्य उपक्रम आयोजित केला जातो हि खरोखरच अभिनंदनीय बाब आहे.अहमदनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव २०२२ सारखा उपक्रम नागरकरांच्या ज्ञानाची भूख भागविणारा अतिशय स्त्युत्य असा उपक्रम आहे असे प्रतिपादन म सा प चे विभागीय कार्याध्यक्ष जयंत येलूलकर यांनी केले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यलयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला अहमदनगर ग्रंथोत्सव २०२२ च्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर,अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या  प्रा. देशमुख, एन बी धुमाळ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ग्रंथोत्सव च्या शेवटच्या दिवसाची सुरवात कवी संमेलनाने झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे होते. तर व्यासपीठावर प्रा डॉ शंकर चव्हाण, प्रा शशिकांत शिंदे, मेधा काळे हे उपस्थित होते. यावेळी कवयित्री सौ. शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, स्वाती पाटील, सुजाता पुरी, संगीता फसाटे, किशोर मरकड, ल. धो. खराडे, डॉ. सौ सुधा कांकरिया, बेबीताई गायकवाड , सुदर्शन धस, कृष्णकांत लोणे यांनी काव्य वाचन केले. नगरमधील अनेक नामांकित कवींनी आपला सहभाग नोंदविला. या काव्य संमेलनाचे सूत्र संचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले. त्यानतर ग्रंथांनी मला काय दिले या विषयावर परिसंवाद झालं. यावेळी विनोदी कथा कथानकार संजय कळमकर , शब्बीर शेख, अविनाश झरेकर उपस्थित हते. आम्ही असे घडलो स्पर्धा परीक्षांतून या विषयावर परिसंवाद पार पडला. त्यात धुमाळ उद्योग समूहाचे एन. बी. धुमाळ उपस्थित होते. ग्रंथोस्वाच्या जिल्हा समनवय समितीची धुरा अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सदस्य या नात्याने शिक्षणाधिकारी अशोक कडूस, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, गणेश भगत , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर  यांच्या खांद्यावर होती. सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोस्वात विविध प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांचे स्टॊल लावण्यात आले होते. नगरमधील हजारो विद्यार्थ्यांनी आणि वाचन प्रेमींनी या ग्रंथोत्सवाला हजेरी लावली.यावेळी अहमदनगर मधील शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद व विविध ग्रंथालयाचे प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

पत्रकार मयुर मांडलिक

मयुर मांडलिक नेवासा तालुका पत्रकार देशरत्न न्युज बातमी देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करा 8530101847

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे