वरखेड येथील श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचा कोर्टाचा निकाल कारखान्याच्या बाजूने लागल्याने कार्यकर्ते यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला
बाळासाहेब पिसाळ
वरखेड येथील श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचा कोर्टाचा निकाल कारखान्याच्या बाजूने लागल्याने कार्यकर्ते यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला……मा.आ.बाळासाहेब मुरकुटे
श्री स्वामी समर्थ शुगर प्रायव्हेट लिमिटेड वरखेड कारखान्याचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये शिवतारे बाप्पू यांच्या बाजूंनी लागल्याबद्दल भेंडा येथे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी शेतकऱ्याच्या वतीने बोलताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील म्हणाले कि नेवासा तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर कारखान्या कडून नेवासा तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. हे दोन्ही कारखान्यांनी विरोधकांचा ऊस वेळेवर तोडला नाही. जो 14 ते 16 महिन्यांमध्ये तोडायला हवा होता त्याला 24 ते 26 महिनेलावले जात असताना संबंधित शेतकऱ्यांना तो ऊस तोडण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च आला. हा ऊस ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने नेला असता तर शेतकऱ्यांना २४००रु. भाव मिळाला असता परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर न तोडता बाहेरून स्वस्त दरात ऊस आणून गाळप या दोन्ही कारखान्यांनी केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला ऊस 1900 ते 2100 रुपये या दराने बाहेरील कारखान्यांना द्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचा 400 ते 500 रुपये तोटा या कारखान्यांमुळे झाला आहे.
श्री स्वामी समर्थ साखर कारखाना हा तीन वर्षांपूर्वीच उभा राहिला असता तर शेतकऱ्यांचे हाल आज झाले नसते. आणि हा अतिरिक्त उस श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याला गेला असता. परंतु ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यांनी हा कारखाना होऊ नये म्हणून अनेक अडचणी आणल्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्याचा तोटा झाला. परंतु आज कोर्टाने श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या बाजूने निकाल दिल्यामुळे उस उत्पादक शेतकरी वर्गात आनंदव्यक्त केला जात आहे.
या निकालामुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अंकुश काळे यांनी आपले मनोगत मांडले यावेळी दत्तुभाऊ काळे भाऊसाहेब फुलारी बंडूभाऊ अरगडे प्रताप चींधे येडुभाऊ सोनवणे समीर पठाण जावेद शेख राजू शेख देवेंद्र काळे बाबासाहेब वाघडकर दत्तू लांघे सतीश शिंदे सुनील साळवे सूर्यकांत गुंड हरिभाऊ गुंड नारायण उरे श्री स्वामी समर्थ शुगर प्रायव्हेट लिमिटेड वरखेड कारखान्याचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये शिवतारे बाप्पू यांच्या बाजूंनी लागल्याबद्दल भेंडा येथे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी शेतकऱ्याच्या वतीने बोलताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील म्हणाले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून आनंद साजरा केला नेवासा तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर कारखान्या कडून नेवासा तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. हे दोन्ही कारखान्यांनी विरोधकांचा ऊस वेळेवर तोडला नाही जो 14 ते 16 महिन्यांमध्ये तोडायला हवा होता त्याला 24 ते 26 महिने लागले तो ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांना दहा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च आला. हाऊस जर ज्ञानेश्वर मुळा कारखान्याने नेला असता तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला असता परंतु विरोधात असल्याकारणाने शेतकऱ्यांचा ऊस न तोडता बाहेरून स्वस्त दरात ऊस आणून गाळप या दोन्ही कारखान्यांनी केला त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला ऊस 1900 ते 2100 रुपये या दराने बाहेरील कारखान्यांना द्यावा लागला आसे त्यामुळे शेतकऱ्यांचा 400 ते 500 रुपये तोटा हे कारखानदार करत होते.
श्री स्वामी समर्थ साखर कारखाना हा तीन वर्षांपूर्वीच उभा राहिला असता व शेतकऱ्यांचे हाल आज झाले तालुक्यातील अतिरिक्त ऊस स्वामी समर्थ साखर कारखान्याला गेला असता. परंतु ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यांनी हा कारखाना होऊ नये म्हणून बऱ्याच अडचणी आणल्या व शेतकऱ्याचा तोटा केला परंतु आज कोर्टाने श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे.
भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अंकुश काळे यांनी आपले मनोगत मांडले यावेळी दत्तुभाऊ काळे भाऊसाहेब फुलारी बंडूभाऊ अरगडे प्रताप चींधे येडुभाऊ सोनवणे समीर पठाण जावेद शेख राजू शेख देवेंद्र काळे बाबासाहेब वाघडकर दत्तू लांघे सतीश शिंदे सुनील साळवे सूर्यकांत गुंड हरिभाऊ गुंड नारायण उरे विनायक मिसाळ संतोष मिसाळ पाडळे ज्ञानदेव रामभाऊ तागड बाळासाहेब वाघ अशोक गिलबिले पंढरीनाथ फुलारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट…..
अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला…..
नेवासा तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन्ही सहकारी साखर कारखान्याकडून उस तोडणी साठी मोठी पिळवणूक केली जात होती कमी भावात बाहेरून उस आणून कार्यक्षेत्रातील काही शेतकऱ्यांचा ऊस तसाच ठेवून त्रास दिला जात होता. परंतु आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार.मा.आ.बाळासाहेब मुरकुटे नेवासा