नेवासा-
हंडीनिंमगाव येथील कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले ग्रामसेवक वाघ भाऊसाहेब यांचा आज हंडीनिमगाव ग्रामपंचायती मध्ये साईनाथ ग्रुप हंडीनिमगाव चे अध्यक्ष श्री किरण जाधव,कुणाल पिसाळ,किरण गरड सोनू पिटेकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला,
हंडीनिमगाव या आपल्या कार्यस्थळी वाघ भाऊसाहेब यांचे ओळख ही कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक अधिकारी म्हणून आहे , वाघ भाऊसाहेब यांची बदली झाली आहे त्यामुळे आज हंडीनिमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
या वेळी उपस्थित ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक भाऊसाहेब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी अण्णा पाटील जावळे(ग्रा.प.सरपंच),श्री शिवाजी जाधव(ग्रा.प.उपसरपंच),गणेश जावळे(ग्रामस्थ),ऍड.कल्याणराव पिसाळ,नितीन कांबळे (ग्रा.प.सदस्य),भीमा कांबळे(ग्रा.प.कर्मचारी),दादा कांबळे आदी उपस्थित होते

