पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना भारतीय जनता पार्टी नेवासा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
बाळासाहेब पिसाळ
मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात निषेद बोर्ड लावल्याबद्दल संबंधितांवरती कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना भारतीय जनता पार्टी नेवासा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. घोडेगाव व सोनई येथे मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या विरोधात निषेद बोर्ड लावून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहे. मा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही.
हा सर्व विरोधकांचा खटाटोप असून मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांना बदनाम करून लोकांची सहानभूती मिळवण्याचे काम व आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जलसंधारण मंत्री गडाख करत आहेत.तालुक्यामध्ये दहशत निर्माण भरण्याचे काम गडाख करत आहे. हा प्रकार यागोदर तालुक्यामध्ये झालेला असून. तरी झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असून सदर बदनामीचा बोर्ड लावणाऱ्यांनवर्ती कठोर कार्यवाही करण्यात यावी. विनंती करण्यात आली. यावेळी मा आ बाळासाहेब मुरकुटे पाटील तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रताप चिंधे काळे मामा ओबिसी तालुका अध्यक्ष देविदास साळुंके किसान मोर्चा तालुका अध्यक्ष तुळशीराम झगरे तालुका उपाध्यक्ष किरण जावळे यावेळी उपस्थित होते.