कुकाणा-कौठा रस्त्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग अभियंत्याला काळे फासण्याचा इशारा….!
नेवासा(तालुका प्रतिनिधी )।तालुक्यातील कुकाणा ते कौठा रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंत्याला काळे फासण्याचा इशारा जीवन ज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले यांनी दिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंत्याला दिलेल्या निवेदनात जीवन ज्योत फाऊंडेशनने म्हंटले आहे की,कुकाणा ते देवगाव पुढे देवगांव ते फत्तेपुर व कौठा कडे जाताना संपुर्ण रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत वारंवार सांगुन ही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कुकाणा ते कौठा रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहन चालकांना व प्रवाशांना अंगावर शहारे उभे राहतात. अनेक वेळा रात्रीच्या वेळी खड्डा अंदाज न असल्यामुळे अनेक वाहन चालकाना गंभीर अपघाताना सामोरे जावे लागले आहे. अनेक मोटारसाइकल स्वारांना अपघातात गंभीर दुःखापत होऊन अपंगत्व आले आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा समजला जातो. कुकाणा ही बाजार पेठ असल्याने बाजाराच्या दिवशी व्यापारी व बाजार करुन इत्यादी सकाळी सात वाजल्यापासून ये-जा होताना दिसते.
या रस्त्याची साईड पट्टी ही अत्यंत खराब झालेली आहे. एक ते दोन फुट खोल खड्डे झालेली आहे. त्यामुळे दुचाकींचे अपघात होतात. रस्त्याचे दुरावस्थामुळे अपघाताना बळी पडतात. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा विदर्शनास आणून दिले असून देखील संबंधित अधिकारी दुरुस्तीच्या प्रश्नाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. खड्डे बुजविले नाही तर जीवन ज्योत फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने येत्या पंधरा दिवसामध्ये निष्पाप वाहनधारकांचा बळी घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे नेवासा उपविभागीय अभियंता यांना काळे फासणार असल्याचा इशारा जीवन ज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले, अक्षय बोधक,विशाल तुपे, विशाल शिंदे,आप्पासाहेब आरगडे,नितीन आरगडे,अभिजीत बोधक,संदेश बोधक,कल्याण ठुबे,सागर रंधवे,काकासाहेब ठुबे,चंद्रकांत आरगडे,नानासाहेब आरगडे,प्रदिप आरगडे,शकिल शेख आदींनी दिला आहे.