नांदेड

मानवते करीता योगा हा महत्वपुर्ण घटक माणला जातो… प्राचार्य डॉ . हरिदास राठोड सर

एम बी कवठेकर...

मुखेड..
१४ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेत पंतप्रधान मा . नरेंद्र मोदी यांनी योगा हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
 २१ जून २०१५ पासून हा दिवस प्रत्यक्ष साजरा करने सूरु झाले आहे. योगा करण्यासाठी वय , जात , धर्म याचे बंधन नाही . सर्व माणवी घटकांना सर्वांनाच याचा फायदा होतो
आरोग्य चांगले राखण्यासाठी , शरीर फीटनेससाठी योगा महत्वाचा आहे . योगा बद्दल जागरुकता समाजामध्ये म्हणावी तशी आजुन झाली  नाही . शास्त्रोक्त पद्धतीने योगा कसा करावा याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे . २०२२ हे वर्ष मानवते करीता योगा हे ब्रीदवाक्य घेवुन साजरे केले जात आहे.
 कारण मागील कोरोनाच्या काळापासून योगाचे महत्व सर्व मानव जातीच्या लक्षात आले आहे. मानवतेसाठी योगा महत्वपुर्ण आहे.
 असे प्रतिपादन ग्रामीण ( कला , वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता . मुखेड येथिल प्राचार्य डॉ हरिदास राठोड सर यांनी प्रस्तुत महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना सांगितले
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा विभाग प्रमुख व संयोजक प्रा . सुभाष देठे सर यांनी कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका प्रास्ताविकाच्या माध्यमातून विशद केली आहे.
  1.  सूत्रसंचलन शिक्षक सहकारी पतसंस्था वसंतनगरचे सचिव प्रा . डॉ . उमाकांत पदमवार सर यांनी केले . तर आभार सोमनाथ माने सर यांनी मानले . कार्यक्रमास प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते..
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे