नेवासा-
नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथे नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळ,नामदार शंकरराव गडाख समर्थक,उदयन दादा युवा मंडळ यांच्या वतीने सुरेशनगर गाव बन्द ठेऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
मागील चार ते पाच दिवसांपूर्वी नामदार शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहायक यांच्यावर गोळीबार झाला त्यात ते गंभीर जखमी झाले होते, त्या नंतर दोन दिवसांपूर्वी नामदार साहेब व उदयन गडाख यांना ठार मारण्याची धमकी असलेले एक क्लिप व्हायरल झाली.
या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई व्हावी या साठी सुरेशनगर ग्रामस्थ यांच्या कडून दुकाने बंद ठेऊन व गाव बंद ठेऊन जाहीर निषेध करण्यात आला