ब्रेकिंग

वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण – वृक्षसंवर्धन कार्यक्रम…

धनंजय मेंगडे पुणे , प्रतिनिधी

आंबेगाव (मेंगडेवाडी)सामजिक कार्यकर्ते श्री.हनुमंत सावळेराम टाव्हरे (अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त) यांची मुलगी अदिती हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओंकारेश्वर हिल (मेंगडेवाडी ) येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी देशी वटवृक्ष आणि चिंचेचे रोपे लावण्यात आली हनुमंत टाव्हरे हे समाजातील विविध स्तरामधील लोकांसाठी काम करतात लोकांच्या अडीअडचणीत मार्गदर्शन करणे, जनतेच्या समस्या प्रशासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात…

माझी मुलगी कु.अदिती (सुधासिंधु) हिने ही सामजिक बांधिलकी जपत समाज कार्याचा वसा घेऊन समाजसेवा करावी आणि भावी समाजसेविका व्हावे अशीच माझी अपेक्षा आणि तिला आशीर्वाद आहेत तिला ही सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने निसर्गाची जाणीव व्हावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले असे हनुमंत टाव्हरे यांनी वृक्षारोपण प्रसंगी भावना व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी टाव्हरे कुटुंबीय,समाजसेवक गणेश शिवाजी मेंगडे  व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे