दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

अहमदनगर जिल्हात”या”ठिकाणी होणार महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल…..

अहमदनगर प्रतिनिधी।भारतात सहा ठिकाणी काचेचे पूल आहेत. मात्र महाराष्ट्रात काचेचा पूल नाही. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल तयार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात होणार आहे.नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने राज्याच्या अर्थसंकल्पातून 5 कोटी रूपये मंजूर करून आणला आहे.त्यासाठी पाच कोटी रुपये अर्थ संकल्पत मंजूर झाले आहेत.त्यापैकी अडीच कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आमदार लहामटे पुढे म्हणाले की, अकोले तालुक्यातील पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.अकोले तालुक्यात रंधा धबधबा येथे लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी पैकी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत अकोले तालुक्यात भरपूर निधी आणला असून यापुढे ही तो आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात नंबर एकचा निधी फक्त अकोले तालुक्यात आणला असून पुढारी जरी माझ्यावर नाराज असतील मात्र तालुक्यातील जनता खुश आहे.उपजिल्हा रुग्णालयासाठी जुलैपर्यंत 45 लाख रुपयांचा निधी येणार आहे.अकोले नगरपंचायतला 5 कोटीचा निधी देण्यात आला असून प्रवरा नदीचे ही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. निळवंडेच्या उजव्या कालव्याचे पाणी ऑक्टोबरमध्ये देण्याचा मानस आहे. हा तालुका ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आवडता तालुका असून निधी कमी पडणार नाही असे ही ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे