दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

शनिशिंगणापूरात दोन लाख भाविकांचे शनिदर्शन…..!

नेवासा प्रतिनिधी। नवीन वर्षाची सुरुवात माघे झाले गेले ते विसरुन जाऊन एक आनंददायी गुढी उभारून जीवनाची सुरुवात आज दि.२ एप्रिल २०२२रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनी भाविक शनिमस्तक होऊन करण्यात आली.दोन वर्षानंतर प्रथमच केंद्र सरकार व राज्यसरकारने कोविड १९ चे निर्बंध हटवल्याने भाविकांनी शनिदर्शनसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.त्यात प्रामुख्याने भाविकात आनंदाचे वातावरण पसरले होते.

प्रवरसंगम येथून ५०० स्थानिक कवडधारकांनी पाणी आणून शनिदेवाला स्नान, विधिवत पूजा ,गाठी,बेसन,पुरी, लाडू,शेरणी,असा पारंपरिक पद्धतीने अनेकानी नैवेद्य अर्पण करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. या प्रसंगी कवडधारकांनी आणलेल्या जलाची गावातून भव्य ढोल तश्याच्या व आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली होती. मंदिर परिसरात व चौथरा ठिकाणी फुलांची सजावट केलेली होती. सकाळी १२ वा.त्रिंबक महाराज यांच्या हस्ते व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.शनिवार असल्याने शनिभाविकाची व स्थानिक परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.अनेकांनी मिठाईचे, स्टेशनरी, पूजेचे साहित्य,,प्रसाद,आदी दुकाने थाटली होती.देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे,प्रा.शिवाजी शेटे,पोपटराव कुऱ्हाट, छभुराव भूतकर, बाळासाहेब बोरुडे, शनिभक्त सोनी,पोपट शेटे,पत्रकार विजय खंडागळे,पोलीस पाटील ऍड.सायराम बानकर आदी तळ ठोकून होते.

सलग दोन वर्षातून देवस्थाने बंद होते,आता भाविकांना दर्शनासाठी सर्व नियम शिथिल केल्याने व ओमीक्रोम विषाणू रोग कमी झाल्याने गुढीपाडव्याच्या निमित्ताने दोन लाखाहून अधिक भाविकांनी दिवसभर आवर्जून हजेरी लावून शनिदेवाचे दर्शन घेतले.

प्रवेशद्वार, मंदिरपरिसर,शनिचौथर्या ठिकाणी विद्यतूत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठीक ठिकाणी भाविकांना प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते. भावी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त स.पो.नि.रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला होता. दिवसभरात अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.

सोमवारपासून शनिशिंगणापूरात अखंड हरिनाम सप्ताह नियोजन

दोन वर्षानंतर प्रथमच सोमवार दि.४/४/२२ते ११ /४/२२ पर्यंत रोजी उदासी महाराज यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार असल्याने त्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, यांची किर्तन रूपी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे वतीने करण्यात आले आहे. ही सेवा दोन वर्षांपासून कोविड १९ मुळे बंद होती.यावर्षी चालू झाल्याने भाविकांना याचा आनंद घेता येईल. देवस्थानचे पदाधिकारी ,कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले हे व्यवस्था वर लक्ष ठेऊन होते.विशेष अतिथीचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले, व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते.दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता. गुढी पाडवा यात्रा शांततेत पार पडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे