दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग ! वाटपाची बोगस फेरफार नोंद रद्द पारनेर प्रांत अधिकाऱ्यांचा आदेश

प्रतिनिधी : मयुर मांडलिक नेवासा (माळीचिंचोरा )

अहमदनगर : मौजे आळकुटी ता , पारनेर . येथील वाटपाची बोगस व बनावट फेरफार नोंद रद्द करण्याबाबतचा आदेश मा . प्रांत अधिकारी पारनेर , यांनी नुकताच पारित केला आहे 

मौजे आळकुटी, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील गट नं. ७१०, ६९४, ६६७, ७०४ या मिळकती संदर्भात फेरफार नं. २५६१ अन्वये सन २०१३ साली लक्ष्मण रखमा शिंदे, किरण कोंडीबा शिंदे व शांताबाई संभा शिंदे यांचे दरम्यान वाटप झाल्याची नोंद घेण्यात आली होती. सदरची मिळकत लक्ष्मण रखमा शिंदे व शांताबाई संभा शिंदे यांची वडिलोपार्जित असून गांवातील किरण कोंडीबा शिंदे याचा काहीएक रक्ताचा नातेसंबंध नसताना देखील सदर मिळकतीस वाटपाने त्याचे नावाची नोंद झाली होती.

 

सदर नोंद रद्द होऊन मिळण्यासाठी रखमा लक्ष्मण शिंदे, संदिप लक्ष्मण शिंदे व इतर यांनी मा. प्रांत अधिकारी, पारनेर भाग यांचेकडे आर.टी.एस. अपील दाखल केले होते. सदरचे अपिलाची गुणदोषावर सुनावणी झाली. सदर अपिलामध्ये किरण कोंडीबा शिंदे हा लक्ष्मण शिंदे व शांताबाई शिंदे यांचे वंशावळीतील नसल्याची बाब अपिलार्थी यांचे वकीलांनी निदर्शनास आणून दिली. हिंदू वारसा कायदा १९५६ मधील तरतूदींप्रमाणे किरण कोंडीबा शिंदे हा संयुक्त कुटूंबातील घटक नाही, केवळ शिंदे या आडनाव साधर्म्याचा गैरवापर करुन सदर व्यक्तीने खोटी नोंद महसूल दप्तरी केल्याचा युक्तीवाद अपिलार्थी यांच्या वकीलांनी केला. सदरचा युक्तीवाद व अपिलातील मुद्दे ग्राह्य धरुन मा. प्रांत अधिकारी, पारनेर भाग यांनी सदरची फेरफार नोंद म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ व शासन परिपत्रक दिनांक ०५/०६/१९९२ शी विसंगत असल्याचे अनुमान काढून सदरची नोंद रद्द करण्याबाबत नुकताच आदेश पारित केला.

 

अपिलार्थी यांच्या वतीने ॲड. प्रशांत मोरे व ॲड. मंगेश औटी यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. देवा थोरवे, ॲड. अंशाबापु पुंड, ॲड. स्नेहल सरोदे, ॲड. एच.डी.. सपकाळ यांनी सहकार्य केले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे