बवानट लग्न जमवून देणारी टोळी नेवासे पोलिसांनी केली जेरबंद….तीन महीला व दोन पुरुष अटक
प्रतिनिधी –सचिन कडू
नेवासा प्रतिनिधी।युवकाचे लग्न जमत नसल्यामुळे लग्नासाठी बनावट मुलगी दाखविण्याचा बाहणा करुन नवरदेवाला पैशाची मागणी करण्याचा डाव आखला गेला होता माञ नवरदेव चत्तुर असल्यामुळे घटनेची माहीती नेवासा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांना दिल्यामुळे बनावट लग्न जमवून देणाऱ्या टोळीतील तीन महीलेसह दोन पुरुषांना जेलची हवा खावी लागल्याची घटना नेवासा येथे घटली असून आरोपींना शनिवार (दि.१) रोजी नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहीती पोलिस हवालदार तुळसीराम गिते यांनी दिली.
नेवासा येथील बसस्थानकात (दि.३१) रोजी तीन महीलेसह दोन पुरुषांनी बनावट नवरी दाखवून पैसे दिले नाहीतर अतिप्रसंग केल्याची तक्रार करण्याचा बहाणा करुन एक लाख विस हजार रुपयाची मागणी नवरीच्या बनावट पाहुण्यांनी केली
याचा संशय आल्याने चतुर नवरदेवाने नेवासा पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे बनावट लग्नासाठी पैसे घेणाऱ्यांचा डाव फसला असून या नवरीसह तीच्या बनावट नातेवाईकाला नेवासा येथे जेलची ‘हवा’ खाण्यास मिळाली आहे
नेवासा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार व पोलिस हवालदार तुळसीराम गिते यांनी फसवणूक करणाऱ्या नवरीसह तीन महीला आणि दोन पुरुषांवर कारवाई करुन नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आरोपींना शनिवार (दि.१) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहीती पोलिस हवालदार तुळसीराम गिते यांनी दिली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, लोधी मुहल्ला (जिल्हा जालना) येथील विजय देविदास पवार (वय २५) धंदा मजुरी या युवकाचे लग्न समजत नसल्यामुळे या नवरदेव युवकाची बहीन व सासू यांना एखादी मुलगी पाहण्यासाठी या नवरदेव भावाने सांगितल्यामुळे त्याची बहीन मनिषा विष्णू ब्राम्हणे व सासू वच्छला शामराव ब्राम्हणे (रा.तिर्थपुरी ता.घनसांगवी.जि.जालना) यांना सोयरीक जमविण्यासाठी या नवरदेव युवकाने सांगितले त्यामुळे नवरदेवाच्या बहीनीने गावातील ओमकार भाणूदास कासार याला भावाने खुप मुली बघूनही लग्न जमत नसल्यामुळे चांगली एखादी मुलगी बघा नवरदेवाच्या बहिनीने कासार याला सांगितले
त्यामुळे कासार याने तुला मुलगी दाखवितो तीच्या आई – वडीलांकडे लग्न करण्यासाठी पैसे नाहीत तुला लग्नासाठी एक लाख विस हजार रुपये द्यावी लागतील तुला नेवासा येथे मुलगी दाखवितो,असे म्हणून नवरदेवासह बहीन व सासूला नेवासा येथील बसस्थानकात शुक्रवार (दि.३१) रोजी खासगी गाडी करुन आणले. तुला मुलगीचे नातेवाईक दाखवितो ठरलेले पैसे दे,असे कासार म्हणू लागला पैशाशिवाय कासार काहीच हालहाल करत नसल्यामुळे नगरदेवाने नेवासा येथील मिनी बँकेत पैसे काढण्याचा प्रयत्न केला माञ पैसे काढता आले नाही म्हणून कासार याने एका महीलेला फोन करुन नेवासा बसस्थानकात बोलाविले तीने नवरीचे नांव कोमल राजू साठे सांगितले तर मावशीचे नांव संगिता वसंत जाधव,रा पैठण जि.औरंगाबाद,असे सांगून दुसरी महीला सुमन रमेश वाघमारे रा हडपसर पुणे असे सांगून या महीला पैसे मागू लागल्या नवरदेव मुलगा विजय पवार याने मुलीला विचारले असता मला आई – वडील नाहीत असे त्या मुलीने सांगितले तर नवरदेवाला घेवून आलेल्या कासारने मुलीचे आई – वडील गरीब असल्याचे सांगितल्यामुळे नवरादेवाचा हा फसवणूका डाव लक्षात आला नवरदेव आता एक लाख विस हजार देण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सुमन वाघमारे म्हणाली की, गुपचुप पैसे दे आरडाओरड करु लागली तेथे रावसाहेब नारायण वानखेडे हा व्यक्तीही आला लवकर पैसे दे नाहीतर आमच्याकडे आणखी मुली आहेत आम्ही अतिप्रसंग केला म्हणून आरडा ओरड करु अशी धमकी दिली नवरादेवाने हा डाव ओळखून नेवासा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांना घटनेची माहीती दिली पोवार यांनी पेलिस फौजफाटा नेवासा बसस्थानकात पाठवून कोमल राजू साठे,संगिता वसंत जाधव,सुमन रमेश वाघमारे,ओमकार भाणूदास कासार,रावसाहेब नारायण वानखेडे यांना अटक करुन बनावट लग्न आणि फसवणूकीची घटना टळली.या कामगिरीसाठी पो कॉ. गिते, पो कॉ तमनर व महिला पो कॉ दाणे मॅडम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.