बेलापूर बीड परळी रेल्वे मार्गाचा प्रलंबित विषय निकाली काढू केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे
प्रतिनिधी - सचिन कडू
नेवासा प्रतिनिधी। केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील हे काल नेवासा तालुका दौऱ्यावर असताना नेवासा तालुक्याचे मा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या निवासस्थानी चहापाणासाठी आले होते या भेटीत त्यांना बेलापूर परळी रेल्वे मार्गाचे निवेदन देऊन या मार्गाला मंजुरी देण्याची मागणी बाळासाहेब मुरकुटे तसेच बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेकडून करण्यात आली यावेळी मंत्री दानवे यांनी या मार्गावरील सर्व आजी माजी खासदार व आमदार यांची बजेटपूर्वी बैठक घेऊन विषय निकाली काढू असे आश्वासन आमदार मुरकुटे व सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले या वेळी मा आमदार बाळासाहेब मुरकुटे सेवा संस्थेचे अध्यक्ष्य नवाब शहा सचिव रितेश भंडारी कारभारी गरड निसार सय्यद अप्पासाहेब कावरे, प्रताप चिंधे, शरद जाधव मनोज पालखी अंकुश काळे दत्तात्रय लांघे अण्णा पाटील गव्हाणे महेश नवले प्रतीक शेजुळ गायकवाड सरपंच विवेक कांगुने आप्पा गायकवाड राजेश कडू प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटा रे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.