दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

प्राथमिक शिक्षक श्री. भाऊसाहेब चंदन यांच्या ‘दावं’ या लघुपटाला अमेरिकेतील फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार..!

सुहास वेताळ प्रतिनिधी

नेवासा तालुका प्रतिनिधी।अमेरिकेतील सिनेकाफेस्ट मियामी सेंट्रल अमेरिकन शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नेवासा तालुक्यातील मुंगसेवस्ती शाळेचे प्राथमिक शिक्षक श्री. भाऊसाहेब चंदन यांच्या दावं या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हॉनरेबल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला.यापूर्वीही चेन्नई येथील इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म ॲवॉर्ड्समध्ये त्यांच्या दावं या लघुपटाला स्पेसिअल ज्युरी मेंशन ॲवार्ड मिळाला आहे.कोरोना काळात एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटूंबाची झालेली वाताहत, शाळा बंद शिक्षण चालू व लहान मुलाचे पाळीव प्राण्याविषयीचे प्रेम अन त्यामुळे निर्माण झालेली गुंतागुंत यावर भाष्य करणाऱ्या दावं या लघुपटात बालकलाकार अर्जुन काळे,कै. सुरेश काळे, मनिषा काळे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड व शिवाजी गायकवाड यांनी दर्जेदार भूमिका साकारून लघुपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहे.कथा, पटकथा, संवादलेखन , दिग्दर्शन, चित्रीकरण व संकलन या सर्वच बाबी भाऊसाहेब चंदन यांनी उत्तम रितीने हाताळल्या आहेत.भाऊसाहेब चंदन यांनी यापूर्वीही आपल्या शिक्षकमित्रांना सोबत घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये निवड झालेल्या व पुरस्कार मिळवलेल्या दप्तऱ्या, जलसाक्षरता, विराट १८, ॲडीक्ट, गुड्डू, 2020 अशा शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक लघुपटांची निर्मिती केली आहे.भाऊसाहेब चंदन यांच्या या यशाबद्दल नेवासा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे,विस्तार अधिकारी शिवाजी कराड, रेणुका चन्ना, केंद्रप्रमुख नवनाथ फाटके, अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकमित्रांनी, तसेच भेंडा, तेलकुडगाव, देडगाव व घोसपुरी परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे