सौंदाळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ज्ञानेश्वर ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय…!
नेवासा प्रतिनिधी। सौंदाळा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित. सौंदाळा पंचवार्षिक निवडणुकीत ज्ञानेश्वर ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय मिळवला.12 पैकी 8जागेवर विजय मिळवत इतर पक्षांनी मिळून बनविलेल्या पक्ष विरहित लोकसेवक पॅनेलचा धुव्वा उडविला.याबाबतची निवडणूक प्रक्रिया जि.प.शाळा सौंदाळा नं.१ येथील केंद्रावर झाली. एकुण 24 जागापैकी 24 जागेसाठी मतदारांनी आपला हक्क बजावला.बर्याच वर्षांनंतर प्रथमच सौंदाळा सोसायटीची प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणूक झाली. अन्यथा आता पर्यंत या सोसायटीची निवडणूक बिनविरोध व सर्वानुमते पार पडत होती. या निवडणुकीत मात्र ज्ञानेश्वर ग्रामविकास पॅनल व इतर पक्षांनी मिळून लोकसेवक पॅनेल स्थापन करुन आमने सामने उतरले होते.यावेळी झालेल्या थेट निवडणुकीनंतर सायं. मतमोजणी झाली.यात सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मध्ये मा.श्री एकनाथ आरगडे,श्री.चंद्रकांत आरगडे,श्री.चांगदेव आरगडे,श्री.बंडू आरगडे,श्री.रामराव आरगडे,श्री.वसंत आरगडे,श्री.अशोक आरगडे,श्री.राजेंद्र चामुटे,तर महिला राखीव सौ.अनिता संतोष आरगडे,सौ.वैजंता कैलास आरगडे,तर अनुसूचित जाती जमाती मधून श्री.दिलीप ताराचंद बोधक,तर इतर मागास प्रवर्ग मधून श्री.अंबादास सुदाम आरगडे,निवडीनंतर ज्ञानेश्वर ग्रामविकास कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारसोबत एकच जल्लोष विजयी मिरवणूक काढली.यावेळी श्री.गोरखनाथ आरगडे,श्री.जालिंदर आरगडे, श्री.दिंगबर आरगडे,श्री.बबन आरगडे, श्री.रघुनाथ आरगडे,श्री.किशोर मुरकुटे,श्री.सुधीर आरगडे, श्री.नंदु आरगडे,श्री.प्रदिप आरगडे,श्री आप्पासाहेब आरगडे,श्री.अभिजीत आरगडे,श्री.संदेश बोधक,श्री.अक्षय बोधक,श्री.शेखर आरगडे,श्री.ओमप्रकाश आरगडे,श्री.अरविंद आरगडे,आदी उपस्थित होते निवडीबद्दल पॅनल प्रमुख मा.श्री ज्ञानदेव आरगडे यानी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असे सांगितले.एकुण १२जागेसाठी सुमारे २४उमेदवारात थेड लढत झाली होती.