दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नेवासा फाटा ते शेवगाव महामार्गावर विडंबनात्मक फलक…!

नेवासा प्रतिनिधी।नेवासा फाटा ते शेवगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने चालू असून हे काम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष कमलेश नवले पाटील यांनी या मार्गाच्या सद्यस्थिती बाबत विडंबनात्मक फलक लावत या प्रश्नाकडे प्रवाशांचे लक्ष वेधले आहे . या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने चालू असून या मार्गावर सावधान राष्ट्रीय महामार्ग आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे . या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे . अनेकवेळा या विषयावर आंदोलने होऊनही उपयोग न झाल्याने नवले यांनी या महामार्गलगत अनेक ठिकाणी जे फलक लावले आहेत . त्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र लावले आहे . या फलकावर आपला राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवसांपासून खराब झाला आहे . या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले असल्याने आपले वाहने सावकाश चालवा असे गडकरी यांनी आवाहन केल्याचे छापले आहे . तर काही फलकावर राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांचे तेव्हडे पाहावे म्हणजे या मार्गावर अपघात होऊन जे चारशे जण मृत पावले त्यांचे आत्मे तुम्हाला राजकीय पदे देतील , अशी टिपण्णी केली .नवले यांच्या या फलकाने या मार्गावरील प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे