ना.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेवर भेंडा येथे मुरमुरे व चिल्लर फेकून निषेध …
नेवासा प्रतिनिधी।कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणार्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस भेंडा येथे मुरमुरे व चिल्लर फेकून निषेध करण्यात आला
यावेळी कमलेश नवले म्हणाले आपले राष्ट्र पुरुष सर्वांसाठी वंदनीय आहेत महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दर्यांमध्ये राहणार्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मविरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. कंपनीमध्ये केलेल्या कामाच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील शेअर्स, आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले 100 तोळे सोने, मंगळसूत्रही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज हे कर्मविरांचे आदर्श होते. याच कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही कर्मविरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले, या पार्श्वभूमीवर भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांकडून व ना. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा निषेध करण्यात येत आहे.
यावेळी जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले ,बाळासाहेब आरगडे,गणेश गव्हाणे ,संकेत बोधक,सुरेश आरगडे,अक्षय बोधक,अभिजीत बोधक,अक्षय आरगडे,जैद शेख,विजय खरात, सचिन तागड,सुहास वेताळ,अविनाश तारकस,प्रविण आरगडे,नरेंद्र आरगडे,ऋषी नवले,रोहित बोधक,प्रतिक आरगडे,आप्पासाहेब आरगडे,तेजस शिंदे,सादिक इनामदार,प्रमोद निकम आदी उपस्थित होते.