दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपरब्रेकिंग

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक हद्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कलम ३६ व ३३ लागू

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक

अहमदनगर प्रतिनिधी :  (दि.१४.डिसेंबर):-जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोग, यांच्याकडून निश्चित करण्यात येऊन १८ डिसेंबर, 2022 रोजी निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होऊन 20 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व 33 (ओ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक हददीत कोणत्याही इसमास गैरशिस्त वागणूक करण्यास मनाई आदेश जारी केले असून हे आदेश 20 डिसेंबर,2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.जिल्हयातील भिंगार कॅम्प,नगर तालुका, एमआयडीसी,पारनेर, श्रीगोंदा,बेलवंडी,कर्जत, जामखेड,शेवगांय,पाथर्डी, राहुरी,श्रीरामपुर शहर, श्रीरामपुर तालुका,नेवासा, सोनई,शनिशिंगणापुर, पारगांव,संगमनेर शहर, संगमनेर तालुका, राजुर,अकोले,राहाता,शिर्डी, लोणी,कोपरगांव शहर , कोपरगाव तालुका,मीरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मनाई आदेश जारी केले आहेत.या बाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास त्या त्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात प्रसंगानुसा र आवश्यक ते कोणत्याही नियनांचे आदेशांचे उलंघन होणार नाही अशा रितीने आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे