तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश.
प्रतिनिधी राहुल बोरुडे
तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश.
राहुरी वार्ताहर तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आरडगाव येथील दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय धनुर्विद्या ,तालुकास्तरीय कुस्तीत प्रथम व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून स्पर्धेत चांगले यश संपादन केले.
त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा या ठिकाणी जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये 19 वर्ष वयोगटांमध्ये जाधव समर्थ तृतीय व तेजस गायकवाड चतुर्थ या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवून यश मिळविले व पुणे डिव्हिजन विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाविद्यालय व ज्युनियर कॉलेज टाकळीमिया या ठिकाणी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी योगेश प्रमोद म्हसे याने 19 वर्ष वयोगट तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच ज्ञानगंगा स्कूल राहुरी या ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये 19 वर्षे वयोगटांमध्ये मुलांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा वेदांता फाउंडेशनचे अध्यक्ष मा. बाबासाहेब मुसमाडे सर व तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजने भव्य दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जगदीश मुसमाडे, प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे,फिजिकल डायरेक्टर राहुल बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळेस उपस्थित कॉलेजचे प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे सर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. सागर वाघ, प्रा संतोष आनाप, प्रा. सुरज तनपुरे, प्रा. गौरी सूर्यवंशी, प्रा. गौरी म्हसे, प्रा. प्रियाली दरंदले- मुसमाडे, प्रा. सोनाली शिरोळे, प्रा. अश्विनी खिलारी, प्रा. स्वाती कोबरने,प्रा प्रांजली करपे शिक्षकेतर कर्मचारी हेड क्लार्क सलीम पठाण, आकाश बोर्डे, अमोल पवार सर्व उपस्थित होते.