देशरत्न न्युज प्रतिनिधी – मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तत्वाची,
तु जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणूसकीची….
तु देव नव्हतास, देवदूतही नव्हतास “
तु मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास….
मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दालतांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वत: च्या अलौकिक विद्धत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा, अस्पृश्यता मिटनवण्यासाठी चढनापरिस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्नू ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ तत्वज्ञ, समाजसुधारक होते. भारतीय राज्यघटनेचे राजकारणी शिल्पकार होते. त्यांनी दलित चळवळ उभी केली. त्या काळात दलित लोकाना अस्पृश्य समजले जायचे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता इतकेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता अशा लोकाना तुच्छतेची वागणूक दिली जायची. डॉ. आंबेडकरानी जातीभेद, अन्यायाविरूद लढा दिला. नागरिकांना त्यांचे मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला, त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडीलांचे नाव ‘रामजी’ व आईचे नाव ‘भीमाबाई’ असे होते. डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असे होते. ते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते. त्यांना शाळेत प्रवेश देण्यास नकार मिळाला कारण ते दलित समाजाचे होते वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावे लागले ते अत्यंत अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांच्या बालपणी त्यांना मिळालेली तुच्छतेची वागणूक ही अन्याया विरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली. सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मुलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च-नीच भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा. सत्याग्रह, संविधान अशी महान कार्ये केली. ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले. अशा महामानवास दैनिक देशरत्न न्युज कडून विनम्र अभिवादन!