ई-पेपर
शेंदोडा खुर्द येथे कृषी दुतानकडून ई पिक पाहणी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन……
नागपूर प्रतिनिधी।ई पिक पाहणी या शासनाच्या नवीन धोरणाने कृषिला तंत्रज्ञानाची जोड निर्माण झाली आहे आणि याचं माध्यमाने तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारने ई पिक पाहणी या ॲप चां अवलंब केला आहे.
मात्र ई पिक पाहणी हा नवीन उपक्रम आसल्याने खूप शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यावर तोडगा म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचालित कृषी महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थ्यांनी मौजा शेंदोडा खुर्द येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना संपूर्ण माहितीनिशी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी प्रथमेश तळहांडे यांनी तलाठी मीनल दे. तिखे मौजा शेंदोडा खुर्द यांच्या विद्यमाने ई पिक पाहणी चे प्रात्यक्षिक करून ई पिक पाहणी चे महत्व शेतकऱ्यांना स्पष्ट करून दिले.