कोकण
वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए.आर.अंतूले विज्ञान महाविद्यालय म्हसळा, येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच युनिट आजपासून कार्यरत.
म्हसळा. प्रतिनिधी
दक्षिण जिल्हा रायगड मधील म्हसळा, बोर्ली, श्रीवर्धन या तिन्ही तालुक्यातील महत्वाचा महाविद्यालयापैकी एक असे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए.आर.अंतूले विज्ञान महाविद्यालय म्हसळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच युनिट स्थापन झालं. युनिटचे अध्यक्ष रोहित पाटील उप युनिट अध्यक्ष राहुल पेरवी जयेश पाटील यांची नियुक्ती माननीय अमितजी ठाकरे यांच्या आदेशानुसार दक्षिण जिल्हाअध्यक्ष प्रतीकजी रहाटे यांनी दक्षिण जिल्हा मध्ये 7वे युनिट स्थापन केले. सोबत दक्षिण उप जिल्हाअध्यक्ष मृदास भाई तोंडालेकर मनसे तालुका अध्यक्ष स्वप्निलजी करडे शहर अध्यक्ष रुपेशजी साळुंखे प्रसाद जवळे,सुमित म्हशीलकर,केदार जोशी आणि युनिट चे संपूर्ण टीम उपस्थित होती. अमित साहेबाच्या कोकण दौऱ्यानंतर पुन्हा एकदा जोश कार्यकर्त्यानंमध्ये पाहायला मिळतोय.