पोलिस कर्मचाऱ्यास खुरप्याने मारहाण – आरोपीस जामीन मंजुर
प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( नेवासा )
अहमदनगर : पारनेर पोलीस स्टेशन भा द वि कलम ३५३ , ३३२ , ३२३ , ५०६ , १०९ , ३४ या कलमा नुसार दाखल गुन्हातील आरोपींना अहमदनगर येथील मा सत्र न्यायाधीश साहेबांनी नुकताच जामीन अर्ज मंजुर केला आहे
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीगत –
पोलीस रेकॉर्डला फरार असणारा आरोपी गिरजु रोहिदास चिकणे यास ताब्यात घेण्याकरीता पारनेर पोलीसांचे पथक मौजे ठाकरवाडी, बाभुळवाडा ता. पारनेर येथे गेले असता आरोपी या ठिकाणावरुन पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलीस आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपीचा चुलता अनिल देवराम चिकणे, गिताबाई रोहिदास चिकणे, सिताबाई चंदन चिकणे, अनिता अनिल चिकणे यांनी शासकीय कामकाजात अडथळा केला. त्यावेळी अनिल देवराम चिकणे याने तुम्ही आरोपीला पकडू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन त्याच्या हातातील • खुरप्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. गिताबाई रोहिदास चिकणे हिने देखील कानाजवळ खुरपे मारुन पोलीसास जखमी केले. अनिता अनिल चिकणे हिने मारहाण करुन पोलीसाचा शर्ट फाडल्याबाबत व सरकारी काम करत असताना अडथळा निर्माण केल्याबाबत पोलीसांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे पारनेर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ३२३, ५०६, १०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदरच्या गुन्हयातील आरोपी नामे गिताबाई रोहिदास चिकणे, सिताबाई चंदन चिकणे, अनिता अनिल चिकणे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. पारनेर पोलीसांनी या आरोपींना नुकतीच अटक केली असता, मा. पारनेर न्यायालयाने आरोपींना त्याच दिवशी न्यायालयीन कोठडीत घेण्याचा आदेश पारित केला. आरोपींनी जामीन मिळण्याकरीता अहमदनगर येथील मा सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जाची नुकतीच सुनावणी झाली मा सत्र न्यायालयाने आरोपींना अटी व शर्तीवर जामीन मंजुर केला आरोपींच्या वतीने ॲड मंगेश औटी ॲड प्रशांत मोरे यांनी कामकाज पाहिले