नेवासा प्रतिनिधी-
भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना त्यांच्या यशस्वी ८ वर्षांची कार्यकाल पूर्ण झाल्या बद्दल बूथ सक्षमीकरण पर्व,सुशासन पर्व व गरीब कल्याणकारी पर्व पंधरवडा आयोजनाच्या निमित्ताने संघटनात्मक बैठक लक्ष्मी मंगल कार्यालय नेवासा,पावन गणपती समोर आयोजित करण्यात आली होती.
या वेळी भाऊसाहेब फुलारी यांनी प्रास्ताविक केले,प्रमुख मान्यवर पैकी मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील,जी.प.अध्यक्ष मा.विठ्ठल राव लंघे, राजेंद्र जी गोंदकर (भाजप जिल्हा अध्यक्ष) यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.ना.आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, केंद्र सरकार मार्फत ७८ विविध योजना राबविल्या जात आहेत, त्या मध्ये गरीब कल्याणकारी योजना,उज्वला गॅस,किसान सन्मान योजना,घरकुल,मोफत धान्य,इश्रम कार्ड,मोफत लसीकरण इत्यादि.
याच वेळी बोलताना विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार वर देखील निशाणा साधला, राज्य सरकार धनगर आरक्षण,ओ बी सी आरक्षण, मराठा आरक्षण च्या बाबतीत अपयशी ठरले, पुढे बोलताना ते म्हणाले की राज्य सरकार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करून अडीच वर्षे झाली परंतु प्रत्यक्षात मात्र अवलंब झाला नाही,
महाविकास आघाडी सरकार च्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे लक्तरे रोजच बघायला मिळतात, गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटून बसतात तसे हे सत्तेला चिकटून बसलेत अशी खरपूस टीका सुद्धा केली,
पक्ष सोडून इकडे तिकडे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बाबतीत विखे पाटील बोलले कि,रणांगण सोडून पळून जाणाऱ्यांची आपल्याला गरज नाही, सत्तेची दहशत नको तर जनतेचे प्रश्न सोडवा हे लोकशाही राज्य आहे असं देखील विखे पाटील बोलले
या कार्यक्रमासाठी मा.आमदार राधाकृष्ण विखे पाटील(मा.मंत्री,महाराष्ट्र राज्य),मा.श्री राजेंद्रजी गोंदकर साहेब(भाजप जिल्हा अध्यक्ष उत्तर नगर),मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील(उपाध्यक्ष -किसान मोर्चा भाजप महाराष्ट्र राज्य),मा.विठ्ठल राव लंघे पाटील(मा.जी.प.अध्यक्ष अहमदनगर),मा.श्री दत्तुभाऊ काळे(जी.प.सदस्य) भाजपा चे सर्व पदाधिकारी शहरप्रमुख,भाजयु मोर्चा सदस्य, सर्व कार्यकारिणी सदस्य ,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख,सर्व पदाधिकारी,नगरसेवक,व भारतीय जनता पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते उपस्थित होते