दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

फुले शाहू आंबेडकरांच्या आदर्श चळवळीची बुज राखा, सर्व पक्षीय आमदारांना मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन….!

अहमदनगर प्रतिनिधी।छञपती शिवरायांचे १३ वे वंशज “युवराज छत्रपती संभाजीराजे” यांना राज्यसभा निवडणुकीत बिनशर्त मतदान करावे असे आवाहन सकल महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र या संघटनेने विधानसभेच्या सर्व पक्षीय आमदारांना केले आहे. मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर तसेच जीवन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले यांनी आमदारांना आवाहन करतांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. आपणांस मराठा क्रांती मोर्चाच्या व जीवन ज्योत फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने विनंती करत आहोत की आपण छञपती संभाजीराजेंना बिनशर्त पाठिंबा देऊन आपले बहुमूल्य मत युवराज छत्रपती संभाजीराजे यांना करावे.

छञपती संभाजीराजे हे मराठा समाजा सोबतच बहुजन समाजाच्या अनेक विषयांविषयी सवेंदनशील असून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. आजवर संभाजीराजेंनी गडकोटांचे संवर्धन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती जगभर साजरी व्हावी यासाठी दिल्लीत शिवजन्मोत्सव सोहळा सुरू केला त्याचबरोबर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये राजधानी रायगड येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत,पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली त्यावेळेस सगळ्यात पहिली मदत तसेच बेघर झालेल्यां कुटुंबासाठी अखंड अन्नछत्र त्यांनी सुरू केले, महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामनात रुजविण्यासाठी महाराष्ट्रभर शिवशाहू दौरा,अनेक मेळावे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही सामाजिक घटकांचा विषय असो छञपती संभाजीराजे यांनी त्या विषयाचा पाठपुरावा करुन न्याय मिळवुन देण्याचं कार्य केलेलं हे सतत केलेलं आहे म्हणून छत्रपती संभाजीराजे हे सर्व शोषित घटकांना न्याय देण्यासाठी देशातील सर्वोच्च असलेल्या सभागृहात असणे गरजेचे आहे.

त्यासाठी आपणांस मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तसेच जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने विनंती करत आहोत की आपण छञपती संभाजीराजे यांना बिनशर्त राज्य सभेसाठी मतदान करावे व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या बहुजन विचाराच्या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श तयार करावा. अशी विनंती नवले केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे