
आंबेगाव(घोडेगाव) महाराष्ट्र राज्य वाहतूक पोलीस यांच्यातर्फे करण्यात आले. वाहतूक सुरक्षा अभियान चालवण्यात येत आहे. डिंभे – घोडेगाव येथे असे जनजागृतीपर अभियान वाहतूक पोलिसांच्या वतीने चालू आहे. वाहतूक पोलीस श्री. संपत नारायण कायगुडे हे स्वत: वाहनचालक यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.महाराष्ट्र राज्य वाहतुक सेना कार्याध्यक्ष श्री.अशोक सा. टाव्हरे सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश शिवाजी मेंगडे समाजसेवक श्री.हनुमंत सा.टाव्हरे यांनी या उपक्रमास भेट दिली. त्या वेळी माननीय श्री.संपत कायगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र वाहतूक पोलीस नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात प्रत्येकाने वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहतूक नियम आता कडक झालेले आहेत. दंड रक्कम ही दुप्पट वाढवल्या गेले आहेत त्यामुळे सर्व वाहन चालकांनी वाहन चालवण्याचे कायदे पालन करून आम्हाला सहकार्य करावे यातच आम्हालाही आनंद आहे.