दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

नांदेङ जिल्ह्यातील 925 शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ट श्रेणी लागु सीईओ वर्षा ठाकुर घुगेंने शिक्षकांना दिली गुङी पाङवा भेट…

नांदेड :-

जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाच्‍यावतीने जिल्‍हा परिषद शाळातील ९२५ शिक्षकांना चटोपाध्‍याय वरिष्‍ठ श्रेणी प्रदान करण्‍यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शुक्रवारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी हे आदेश प्रदान केले आहेत.
 यावेळी शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेतन श्रेणी लागू करून मुख्य कार्यकारी अधिका-यांनी शिक्षकांना गुढीपाडवा भेट दिली आहे.असेच म्हणावे लागेल…

ज्या शिक्षकांना सेवेतील बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी देवून वेतन निश्चिती लागू करण्यात येते. याबाबत शासनामार्फत वेळोवेळी तरतुदी करण्यात आलेल्‍या आहेत. नांदेड जिल्‍हा परिषदेत गेल्या तीन-चार वर्षांपासून चटोपाध्‍याय वेतन श्रेणीचा प्रश्न प्रलंबित होता. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या विषयात लक्ष घालून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळो-वेळी बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढलेला आहे.  असे चिञ दिसुन आले आहे..
एवढ्या मोठ्या संख्येने निवड श्रेणी देण्याची नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.असे म्हणावे लागेल..
या वेतन श्रेणीत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्यापध्यापक व केंद्र प्रमुख या संवर्गांचा समावेश आहे. या वेतन श्रेणीसाठी विविध शिक्षक संघटनेने मागणी केली होती. यासंदर्भात मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षणाधिकारी व संबंधीत कर्मचा-यांची प्रथम बैठक घेण्यात आली होती..
 त्‍यानंतर वेळोवेळी बैठका घेवून हा प्रश्‍न निकाली काढण्‍यात आला आहे. यासाठी ९६४ प्रस्‍ताव जिल्‍हा परिषदेला प्राप्‍त झाले होते. त्‍यापैकी ३९ जणांच्‍या त्रुत्री आढळल्‍याने हे प्रस्‍ताव अपात्र ठरण्‍यात आले. पात्र ९२५ शिक्षकांना चटोपाध्‍याय वेतन श्रेणी देण्‍यात आली आहे.
विविध संघटनेने मानले आभार:-
चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्याच्या मागणीचा प्रस्ताव विविध शिक्षक संघटनेचा होता. या मागणीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील सुमारे ९२५ शिक्षकांना आज चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू केलेली आहे. राज्यात नांदेड जिल्हा परिषदेने सर्वाधिक शिक्षकांना एकाचवेळी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा लाभ दिलेला आहे. त्याबद्दल विविध शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे  मनापासुन आभार मानले आहेत…
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा