नांदेड
आदिवासी कोळी महादेव समाजाच्या मागण्या तात्काळ सोडवा — दशरथ लोहबंदे…
मुखेड / प्रतिनिधी
जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे यांचा ढोल बजाव आंदोलनाला जाहीर पाठिंबा…
आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार समाज संघटनेच्या वतीने मुखेड कंधार मतदारसंघाचे भाजपचे संपर्क कार्यालयावर दिनांक ४ एप्रिल रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांनी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या मागण्या तात्काळ सोडवा असे म्हणत या ढोल बजाव आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
आदिवासी कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक ४ एप्रिल रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यासंबंधी तहसिलदार मुखेड यांना निवेदन देण्यात आले होते.
निवेदनात खावटी अनुदान योजना, शबरी घरकुल आवास योजना, समाजाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, आणि उपविभागीय आधिकरी देगलूर आणि कंधार यांनी जातीचे प्रमाणपत्र देताना अडवणूक करत असून त्यांच्या सोबत समाजाची बैठक लावणे अश्या विविध मागण्या संबंधी अनुसूचित जमाती विधिमंडळ कल्याण समितीचे सदस्य यांच्या मुखेड येथील भाजप जनसंपर्क कार्यालयावर आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार समाज संघटनेच्या वतीने ढोल बजाव करण्यात येणार आहे
तरी या आंदोलनास सर्व बहुजन चळवळीतील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहाबंदे यांनी आवाहन केले आहे.
आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार समाजावर अन्याय होत असल्याचे मला माहित असून त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा त्रास होत असून आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार समाज संघटनेने पुकारलेले आंदोलन लोकशाही मार्गाने असून त्यांच्या मागण्या तात्काळ सोडवा व या ढोल बजाव आंदोलनाला माझा जाहीर पाठींबा आहे.
—– जि. प.सदस्य दशरथ लोहबंदे…