कारची मागून धडक रिक्षाचे दोन तुकडे… आठ जण गंभीर जखमी.. दोन मुलींची प्रकृती चिंताजनक…..!
नेवासा प्रतिनिधी। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील उंबरे येथे शनिशिंगणापूरच्या दिशेने जाणाऱ्या तीन चाकी प्रवाशी रिक्षाला कारने मागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये पाच महिला, एक पुरुष, दोन मुली असे आठ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.राहुरीहून शनिशिंगणापूरच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणारी ॲपेरिक्षा उंबरे येथे प्रवासी बसण्यासाठी थांबली. त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या कारने उभ्या असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये (Accident) रिक्षाचे दोन तुकडे झाले असून आठ जण गंभीर जखमी झाले आहे. रिक्षामध्ये पाच महिला, एक पुरुष, तीन ते चार वर्ष वय असलेल्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहे.
मुलींची प्रकृती चिंताजनक…..!
अपघात इतका भीषण होता की रिक्षाचे दोन तुकडे झाले. यात मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी राहुरी पोलीस दाखल होत नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.