नांदेड
मुखेड शहरात घाणीचे साम्राज्य ; नपाने स्वच्छतेविषयी गांभीर्याने घ्यावे मुखेड शहर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन
एम. बी.कवठेकर...
मुखेड:-
मुखेड शहर घाणीचे साम्राज्य शहर बनले असुन याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील अनेक ठिकाणी कचरा उघडयावर टाकला जात आहे.
तर अनेक ठिकाणच्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत नपाने स्वच्छतेविषयी गांभीर्याने घ्यावे असे निवेदन मुखेड शहर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी धनंजय थोरात यांना दि. 29 मार्च 2022 रोजी दिले.
शहरातील घाणीमुळे शहरवासीयाचे आरोग्य बिघडत असुन लहाण मुलांत सुध्दा आजाराचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च होऊन सुध्दा शहर मात्र घाणीचे घर बनले असल्याचे चिञ दिसून येत आहे.
सध्या नगर परिषदेवर प्रशासक असुन नगरसेवकांचा काळ संपल्याने बहुतांश नगरसेवकाचे शहर वासीयांच्या आरोग्याकडे व प्रभागाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत असले तरी आपण याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे..
अनेक प्रभागात घंटागाडी येत नसल्याची नागरीकांची तक्रार आहे. तरी नगर परिषदेने याकडे वेळीच लक्ष देऊन शहरात स्वच्छता ठेवावी निवेदन देण्यात आले..
या निवेदनावर मुखेड शहर विकास आघाडीचे ज्ञानेश्वर डोईजड, संदिप पिल्लेवाड, योगेश मामीलवाड यांच्या स्वाक्ष-या दिसुन आल्या आहेत..