सौ.दुर्गाताई तांबे यांची नेवासाफाटा येथे सदिच्छा भेट
वंचीतांना न्याय देण्याचा प्रयत्न होतो म्हणूनच सर्व जातीधर्माची लोक काँग्रेस पक्षाकडे आकर्षित-सौ.तांबे
काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या संगमनेर येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी नुकतीच नेवासाफाटा येथे सदिच्छा भेट देऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.वंचीतांना न्याय देण्याचा प्रयत्न होतो म्हणूनच सर्व जातीधर्माची लोक आज काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे प्रतिपादन सौ.दुर्गाताई तांबे यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासाफाटा येथील काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांच्या निवासस्थानी सौ.दुर्गाताई तांबे यांचे आगमन झाल्यानंतर
सौ.वाघमारे यांच्या हस्ते पंचारती ओवाळून त्यांचे शाल श्रीफळ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी सौ.दुर्गाताई तांबे यांच्याशी सुसंवाद साधतांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून अनुसूचित विभागाचे सुरू असलेले जिल्हाभर कार्य व उपक्रम यांची माहिती दिली.पक्ष कार्याचा आढावा घेतल्यानंतर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे ज्यामध्ये जाती भेदाला थारा दिला जात नाही.म्हणूनच काँग्रेसच्या झेंडयाखाली सर्वधर्मीय लोक आल्यामुळे पक्षामुळे राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागले आहे.काँग्रेस पक्षाच्या उन्नतीसाठी वंचीत घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी मक्तापूरचे माजी सरपंच रामकृष्ण पाटील कांगुणे, अँड.कल्याणराव पिसाळ, ग्रा.प.सदस्य नितीन कांबळे उपस्थित होते.