रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने रेशनच्या नियमांत बदल केले आहे. रेशन दुकानातून स्वस्त दरात धान्य घेणाऱ्या लाभार्थीसाठीच्या मानकांमध्ये बदल केले आहेत. नवीन मानकांचा मसुदा जवळपास तयार झाला आहे..
सध्या देशात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतात. मात्र, त्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन, सार्वजनिक वितरण मंत्रालयाने लाभार्थ्यांच्या मानकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
*पात्र व्यक्तींनाच लाभ*
स्वस्त धान्य वितरणात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी नवीन मानके पूर्णपणे पारदर्शक केली जाणार आहेत. त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून राज्यांसोबत बैठका सुरू आहेत. नवीन मानके लागू झाल्यानंतर पात्र व्यक्तींनाच लाभ मिळणार आहे..
दरम्यान, डिसेंबर-2020 पर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन-वन रेशन’ योजना सुरु केली आहे.. सुमारे 69 कोटी लाभार्थी (लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक) या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले..
➖➖➖➖➖➖➖➖