दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नागेबाबा मल्टीस्टेट मध्ये विचारधन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न….

नेवासा प्रतिनिधी। श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट करजगाव शाखेमध्ये नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन बाळकृष्ण स्वामी महाराज गोणेगाव आश्रम, तुकाराम महाराज पवार, सूर्यभान दादा फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले. नागेबाबा च्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागेबाबा संस्थेचे विभागीय अधिकारी श्री जमधडे पोपट सर यांनी संस्थेचे चेअरमन श्री कडू भाऊ काळे यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक योजना याबद्दल माहिती दिली. त्यावेळी भाऊसाहेब टेमक सर, पानेगाव चे रमेश आण्णा जंगले, निंभारी चे पोलीस पाटील संतोष पवार, संजय कंक ,सुहास टेमक, मच्छिंद्र जगताप, कंक गुरुजी, विटनोर गुरुजी, अशोक टिककल, गोल्ड व्हॅल्यूअर कृष्णा बु-हाडे , ज्ञानेश्वर बु-हाडे तसेच शाखाधिकारी श्री दीपक तुवर सर, संदीप चव्हाण ,शुभम पवार, दिनेश गाडेकर, आदी सर्व उपस्थित होते. अरुण टेमक सर यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे