दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नेवासे येथील व्यापाऱ्याची पैशाची बॅग पळवली;गोळीबार केला परंतु चोरट्याचा प्रयत्न फसला…..

सचिन कडूपाटील प्रतिनिधी

नेवासा प्रतिनिधी।नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी जवळील एका खाद्य तेल कंपनी मधून कंपनीच्या मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेट जवळ आला असता समोरच काट्यात दबा धरून बसलेले चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना घडली असून चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मात्र सुदैवाने मुलास कुठलिही इजा झालेली नाही. सदरील घटना कळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कर्मचाऱ्यांन सह पाहणी केली व तत्काळ तपासाच्या दिशेने कर्मचाऱ्यांना सूचना करून परिसरात नका बंदी साठी रवाना केले. यावेळी घटना ठिकाणी नागरिकांनी व व्यापारी मोठ्या जमा झाले व परिसरात मोठी खळबळ उडाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे