येत्या पंधरा दिवसात नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू होणार–ना.नितीन गडकरी….!
निलेश मीस्त्री प्रतिनिधि
शिर्डी प्रतिनिधी। नगर-मनमाड महामार्गाच्या कामास येत्या पंधरा दिवसात सुरुवात होऊन हा महामार्ग सुशोभीकरणसह चांगल्या क्वालिटीचा होईल . तशा सूचना दिल्या आहेत.असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांनी दिले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आज दुपारी शिर्डी येथे भेट देऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. नगर-मनमाड रस्त्याने राहत्या कडून ना. नितीन गडकरी यांच्यासह गाड्यांचा ताफा आज गुरुवारी दुपारी शिर्डीत दाखल झाला .शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नामदार नितीन गडकरी यांनी नंतर श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले व त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, नगर मनमाड महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या 15 दिवसात सुरुवात होऊन चांगल्या क्वालिटीचा हा रस्ता बनेल. त्या संदर्भात माहिती घेऊन सूचना दिल्या असल्याचेही सांगत त्यांनी दिवाळीपूर्वी श्री साईबाबांच्या दर्शनाला आलो. ही दिवाळी राज्यातील देशातील कोरोणा घेऊन जावं व देशातील सर्व नागरिकांना सुख-समृद्धी मिळो. असे साईबाबां कडे साकडे घालत देशातील सर्व नागरिकांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिर्डीतील भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, कोपरगाव चे नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींसह भाजपाचे येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नामदार नितीन गडकरी हे उपस्थित साईभक्तांनी हात हलवून त्यांना नमस्कार करत अभिवादन करताना दिसून येत होते.