रामदास पाटील यांचा प्रशासकीय सेवेचा राजीनामा मंजूर राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत….!
प्रतिनिधी।एम बी कवठेकर
मुखेड प्रतिनिधी।हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी. रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला असून पूढे राजकारणात तथा समाजकारणात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. सतत दोन वर्षे कोरोणा सारख्या महामारीत मित्रमंडळातर्फ जिवनावश्यक साहित्य, रुग्णालयात भोजन,चहा , शेतकऱ्यांना मोफत पिक विमा केंद्र ,वैद्यकीय मदतीची सेवा या सारखे उपक्रम शासकीय सेवेत असतांनाच मूखेड तालुक्यात राबविले होते.त्यांनी तालुक्यात जनसंपर्क कायमच मोठा ठेवलेला आहे, आता थेट प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत थेट समाजकारणा सह राजकारणात उतरण्याचा त्यांनी मनोदय जाहीर करीत सोशल माडिया वरील पोस्ट व्हायरल होत आहे.
हिंगोली नगरपरिषदेच्या कार्यकाळात कर्तव्यदक्ष व धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांना ओळखले जाते…
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी 11 वर्षाच्या कारकिर्द प्रशासकीय सेवेनंतर मी राजीनामा दिला होता आणि तो आज राजीनामा मंजूर झाला आहे.
आपले हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही . नक्की आपण माझे मोठा भाऊ होऊन मला मोठं पाठबळ दिले आहे आणि यापुढे राहील. आपण दाखवलेला विश्वास मी कधीच कमी होऊ देणार नाही. खूप मेहनत करेल आणि नक्की नाव करेन आपलं.
सेवा करत असताना सदैव अनेक माध्यमातून मदतीसाठी अविरत कार्यरत होतो. शक्य तो ,जमेल त्याला मदत करत गेलो. ईश्वराने दिल्या आयुष्याला न्याय द्यायचं प्रयत्न केला. यापुढे ही नक्की शक्य तिथं मदतीसाठी पुढं असणार आहे..
अनावधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा . यापुढे ही आपलं चांगल्या पध्दतिच सहकार्य राहील अशी अपेक्षा बाळगतो.
मनातील इच्छा आणि महत्वकांक्षा शांत बसू देत नव्हती म्हणून सारा सार विचार करून निर्णय घेतलाअ आहे…
मी यापुढे राजकीय, सामाजिक जीवनात सक्रिय कार्यरत राहणार आहे. मी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी नक्की मेहनत करणार आहे. त्यासाठी आपली साथ कायम असेल आपल स्नेह , प्रेम कायम राहील- आपला रामदास पाटील सुमठाणकर.यांनी अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
येणाऱ्या काळात राजकारणात विधानसभेच्या अनुषंगाने रामदास पाटील राजकारणात कार्यरत होतील अशी चर्चा सगळीकङे चालू आहे..!