दौंड प्रतिनिधी।दि. 28 ऑक्टोबर 2021 पासून संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू झालेल्या उपोषणा संदर्भात उपोषणाची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने अर्थमंत्री यांची संयुक्त कृती समितीने भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणली. त्यानंतर झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मा.परब साहेबांनी आर्थिक तरतूद नसल्यामुळे दिवाळीनंतर विचार करु असे सांगितले आणि परिवहन मंत्री यांनी या संदर्भात जी बैठक घेतली त्या मध्ये बोलणे निष्फळ ठरल्यामुळे कृती समितीने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आगारामध्ये उपोषण आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आपण पुणे विभागातील सर्व संयुक्त कृती समीती सदस्यांनी आपापल्या आगारात शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे रा. प कर्मचाऱ्यांच्या खालील प्रमाणे आहेत .
प्रमुख मागण्या
🔸 थकीत महागाई भत्ता 28% मिळाला पाहिजे
🔸 वाढीव घरभाडे भत्ता दर 8, 16, 24 % मिळाला पाहिजे
🔸 सण उचल 12500 मिळाला पाहिजे
🔸 दिवाळी बोनस 15000 मिळाला पाहिजे
🔸 वार्षिक वेतनवाढ दर 2% ऐवजी 3% मिळाला पाहिजे
यासह इतर मागण्या साठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यात सर्व कामगारांनी ऐन दिवाळीत संपाचे आणि उपोषणाचे हत्यार उपसले असल्याने प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होणार आहेत. प्रशासनाने र.प कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी सर्व दौंड एस टी कर्मचारी व कृती समितीने केली आहे .